Share

लोका सांगे ब्रह्मज्ञान … राष्ट्रवादीच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटनाला जमली तुफान गर्दी

Published On: 

 पुणे- पुणे शहरातील कोविड रुग्णसंख्या कमी होत असल्याचं पहायला मिळत आहे. रुग्णसंख्या कमी होत असल्याने पुण्यातील निर्बंध हळूहळू शिथील होत आहेत. मात्र, विकेंड लॉकडाऊन अद्यापही कायम असून शनिवार-रविवार पुण्यात केवळ अत्यावश्यक सुविधा वगळता इतर निर्बंध कायम आहेत. पण असे असले तरी आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेली गर्दी पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार हे खरंच पुण्यातील कोरोनाच्या मुद्द्याबाबत गंभीर आहेत का हा सवाल उपस्थित करण्याची वेळ आली आहे.

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी (दि. १९) सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार वंदना चव्हाण, आमदार चेतन तुपे, सुनिल टिंगरे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, तसेच पक्षाचे आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.अजित पवार कार्यक्रमस्थळी पोहोचण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर तुफान गर्दी केली होती. कोविड प्रतिबंधक नियमांचे यावेळी उल्लंघन झाल्याचे  यावेळी पहायला मिळालं.

शहरात शनिवार आणि रविवारी विकेंडला कडक निर्बंध  आहेत. या दोन दिवशी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील बाधित रुग्ण दर कमी न झाल्यामुळे निर्बंध कायम  ठेवण्यात आले आहेत. नागरिकांनी पर्यटनासाठी गर्दी करू नये. अन्यथा जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या नागरिकांना होम क्वारंटाइन करावे लागेल, असा इशारा देखील आजच अजित पवार यांनी दिला होता.

दरम्यान, कोरोनाची भीती दाखवत एका बाजूला पायी वारीसाठी परवानगी दिली जात नाही,विकेंड लॉकडाऊन लावला जातो मात्र दुसऱ्या बाजूला अशा जाहीर कार्यक्रमाना कशी परवानगी मिळते हा देखील एक संशोधनाचा विषय आहे. उपमुख्यमंत्रीच जर अशा पद्धतीने नियम मोडत असतील तर सर्वसामान्य नागरिकांनी पाहायचे कुणाकडे असा सवाल उपस्थित होत आहे.

अजित पवारांची सारवासारव 

या गर्दी प्रकरणावर अजित पवारांकडून दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलंय की, सकाळी बोललेले सभा घेणार नाही, पण मी परत गेलो असतो तर कार्यकर्तेही नाराज झाले असते. मी प्रशांतला (शहराध्यक्ष) सांगितलं होतं हा कार्यक्रम साधेपणाने करा. मात्र, मलाच अशा कार्यक्रमामध्ये बोलावलं जातं जिथं धरताही येत नाही आणि सोडताही येत नाही, त्याबद्दल मी मनापासून दिलगीरी व्यक्त करतो. मी पुणेकरांची दिलगिरी व्यक्त करतो.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!