Share

Vedanta Foxconn | शिंदे-फडणवीस सरकार झोपले होते का? वेदांत-फॉक्सकॉन कंपनीवरुन घमासान

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : वेदांता – फॉक्सकॉन कंपनीवरुन शिंदे-फडणवीस सरकार विरुद्ध महाविकास आघाडीत घमासान पहायला मिळत आहे. वेदांता – फॉक्सकॉन कंपनीला महाविकास आघाडीकडून कमी प्रतिसाद मिळाला. मागील दोन वर्षात योग्य प्रतिसाद न मिळाल्याने कंपनी गुजरात मध्ये गेली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर याच खापर फोडलं. तर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येताच महाराष्ट्रातील उद्याेग गुजरातमध्ये गेले, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. स्वत:साठी खोके आणि महाराष्ट्राल धोके, असे आदित्य ठाकरे म्हणाले. वेदांता – फॉक्सकॉन कंपनी गुजरातमध्ये गेल्याने आरोप- प्रत्यारोपांची मालिका आता राज्यात पाहायला मिळत आहे.

वेदांता लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातील दिग्गज फॉक्सकॉन यांनी गुजरातमध्ये अर्धसंवाहक प्रकल्प आणि डिस्प्ले एफएबी उत्पादन युनिट स्थापन करण्यासाठी गुजरात सरकारसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. वेदांत या प्रकल्पात १,५४,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. गांधीनगर येथे झालेल्या एका कार्यक्रमात माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या प्रकल्पामुळे एक लाख रोजगाराच्या संधी निर्माण होतील. माहितीसाठी हा प्रकल्प महाराष्ट्रात झाला असता तर मोठी रोजगार निर्मिती झाली असती, मात्र राजकीय नेत्यांच्या आळशीपणामुळे ही कंपनी गुजरातला नेण्यात आली. आता राजकीय नेते जरी एकमेकांवर टीका करत असले. तरी यात नुकसान महाराष्ट्राचे झाले आहे. त्यामुळे राज्यातील नागरीकांचे नुकसान राज्यकर्त्यांनी केले आहे. त्यामुळे आता नागरिकांनी सजक होण्याची गरज आहे.

कोणामुळे गुजरातमध्ये गेली वेदांता – फॉक्सकॉन कंपनी?

येत्या जून महिन्यात वेदांता – फॉक्सकॉन कंपनी महाराष्ट्रात येणार होती. मात्र महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर असे काय झाले की प्रकल्प गुजरातमध्ये गेला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून सण-उत्सव जोरात होत आहेत. ते होणारच होते, कारण कोरोनाचा संसर्ग आता कमी झाला आहे. मात्र सरकार सण-उत्सवात व्यस्त असताना, महाराष्ट्रातील रोजगार गुजरातमध्ये जातोय तेव्हा शिंदे-फडणवीस सरकार झोपले होते का?, असा प्रश्न सामान्य बेरोजगार विचारत आहेत. आदित्य ठाकरे म्हणाले, जी कंपनी आपल्या राज्यात जूनपर्यंत येत होती. २६ जुलैला CMO ट्वीटर हॅंडलवर ही कंपनी महाराष्ट्रात येणार असल्याचे म्हटले होते. एका महिन्यात काय घडले की कंपनी गुजरातमध्ये गेली. त्यामुळे महाराष्ट्रात सरकार आहे की नाही असा प्रश्न राज्याला पडला आहे.

विधानसभा निवडणुकीमुळे कंपनी गुजरातमध्ये नेण्यात आली –

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्यामुळे हा प्रकल्प गुजरातमध्ये हलवल्याचे नेटकरी म्हणत आहेत. एकनाथ शिंदेनी ही कंपनी गुजरातला दिली, असा आरोप देखील नेटकरी करत आहेत. गुजरातमधील निवडणूकीसाठी राज्यातील महानगपालिकांच्या निवडणुका लांबवल्या जातात त्यामुळे गुजरातला एवढं महत्व का?, असा प्रश्न निर्माण होत आहे. राज्यात बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, ओलो दुष्काळ अशा समस्या असतांना, ऐवढा मोठा प्रकल्प राजकारण्यांच्या नाकाखालून गुजरातला जातोच कसा, त्यामुळे याची चौकशीची मागणी होत आहे.

नागरिकांचा संताप-

सोशल मीडियावर देखील नागरिक संताप व्यक्त करत आहेत. सरकारने आपल्याला दहीहंडी खेळण्यात व्यस्त ठेवले आणि रोजगार गुजरातला नेला. अमोल मिटकरी म्हणाले, वेदांत फॉक्सकॉन कंपनीला महाविकास आघाडी सरकारने 39 हजार कोटीची सवलत दिली होती तर गुजरात सरकारने 29 हजार कोटीची दिली. तरीही हा प्रकल्प जाणीवपूर्वक गुजरातमध्ये शिंदे सरकारने घालवला. लाखो हिंदू तरुण बेरोजगार केले. यामुळे राज्यपाल आणि मोदीजी व शहा यांना आपण नक्कीच खुश केले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!