🕒 1 min read
नंदूरबार : सध्या महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण खूपच गढूळ झालं आहे. सत्ताधारी पक्षनेते आणि विरोधी पक्षनेते एकमेकांवर आरोप, टीकेबाजी करत असल्याचं दिसून येतं आहे. अशातच शिवसेना पक्षाच्या नेत्या आणि मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली होती. आता त्यांनी केलेल्या टीकेला बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे ?
किशोरी पेडणेकर असतील किंवा चंद्रकांत खैरे असतील. शिवसेनेच्या नेत्यांची अवस्था सध्या वाईट आहे. त्यामुळे असे लोक माझी अक्कल काढतील, बुद्धी काढतील. त्यात मला फारसं वाईट वाटत नाही. एक वेळ अशी येईल की त्यांना त्यांची अशी वक्तव्य बंद करावी लागतील, असं चंद्रशेखर बावन कुळे यांनी म्हटलं आहे. बावनकुळे यांनी नंदूरबारमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
पुढे चंद्रशेखर बावनकुळे असंही म्हणाले की, जेव्हा जनाधार कमी होतो. माणसं तुटत जातात. संघटन कमी होतं. तेव्हा असे वक्तव्य येतात. सध्या त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. त्यामुळे मला काही वाटत नाहीय.
दरम्यान, आगामी निवडणुकीत शिवसेनेचा एकही नेता नसेल, असं बावनकुळे यांनी म्हटलं होतं. त्यावर किशोरी पेडणेकर म्हणाल्या होत्या की, नुसतं बावन्नकुळे आडनाव असून चालत नाही, तर डोक्यात पण काहीतरी असावं लागतं.
महत्वाच्या बातम्या :
- Chandrakant Patil । विद्यार्थ्यांची वसतिगृहाबाबत गैरसोय होणार नाही असे नियोजन करावे – चंद्रकांत पाटील
- Eknath Shinde । BKC नाही शिवतीर्थावरच होणारा दसरा मेळावा? मुख्यमंत्री शिंदेंच सूचक वक्तव्य
- Balasaheb Thorat | “रोजगार देणारे प्रकल्प गुजरातला गेल्यावर महाराष्ट्रातील तरूणांनी फक्त दंही-हंड्याच फोडायच्या का?”
- Rohit Pawar | “…म्हणून तरुणांच्या रोजगाराची संधी हुकली”; रोहित पवार
- Raj Thackeray | 1 लाख 58 हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला; राज ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
