Share

Raj Thackeray | राज ठाकरेंनी मनसे युतीबाबत केलं स्पष्ट, दिले कार्यकर्त्यांना ‘हे’ आदेश

Published On: 

मुंबई : सध्या महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. निवडणुकीचं वारं सगळीकडे घुमू लागलं असून, राज्यातील सर्व पक्ष आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी करायाला लागले असल्याचं दिसून येतं आहे. त्याचबरोबर कोणता-पक्ष कोणत्या पक्षाशी युती करणार याबद्दलही अनेक चर्चा सध्या सुरू आहेत. यामध्ये भाजप, शिंदे गट आणि मनसे पक्ष एकत्र यंदाची मुंबई पालिकेची निवडणुक लढवणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच राज ठाकरे यांनी याबाबत एक सूचक वक्तव्य केलं आहे.

मनसे पक्ष कोणाशी करणार युती?

मनसे पक्ष कोणत्याही पक्षाशी युती करणार नसून, मनसेने पुन्हा एकदा मुंबई महानगर पालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचं ठरवलं असल्याचं, मनसे पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सांगितलं आहे. देशपांडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिले आदेश-

राज ठाकरे यांचे आदेश आम्हाला मिळाले असून पालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. स्वबळावर लढण्याचा निर्धार आम्ही केला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे सर्व 227 जागांवर उमेदवार देणार असल्याचंही संदीप देशपांडे यांनी सांगितलं आहे.

तसेच, काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सध्या रेल्वेची जुळवाजुळव करतोय. काही डबे मागवलेत, असं वक्तव्य केलं होतं. त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून मनसे आणि भाजपमध्ये युती होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. संदीप देशपांडे यांनी यावरही भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, मनसे आणि भाजपाची वाढलेली जवळीक पाहता निवडणूकपूर्व युती होणार नसली तरी आगामी काळात निवडणूक निकालानंतर युती होणार नाही असं आत्ताच ठामपणे सांगता येणार नाही.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!