🕒 1 min read
मुंबई : वेदांता ग्रुप व फॉक्स कॉन चा सेमीकंडक्टर चीफ निर्मितीचा प्रकल्प गुजरातला गेला आहे. यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. एवढेच नाही तर अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. अशातच राष्ट्रवादी पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या कल्याणासाठी सुरतेवर स्वारी करून खजिना महाराष्ट्रात आणला होता आणि आत्ताचे राज्यातील शासक इथे होऊ घातलेल्या एवढा मोठा प्रोजेक्ट आणि महसूल गुजरातला देऊन आले, फरक स्पष्ट व्हावा, एवढाच शुद्ध हेतू अशा शब्दात आव्हाड यांनी ट्विटद्वारे मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
पाहा ट्विटः
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा कल्याणासाठी सुरतेवर स्वारी करून खजिना महाराष्ट्रात आणला होता…
आणि
आताचे राज्यातील शासक इथे होवू घातलेला एवढा मोठा प्रोजेक्ट आणि महसूल गुजरातला देवून आले
फरक स्पष्ट व्हावा एवढाच शुद्ध हेतू— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 14, 2022
दरम्यान, वेदांता-फॉक्सकॉन हा 1.54 लाख कोटी गुंतवणूक असलेला उद्योग अचानक महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा उद्योग पावणे दोन लाख कोटींचा आहे. या उद्योगासोबत १०७ इतर छोटे-मोठे उद्योग उभे राहणार होते. याच्या माध्यमातून ७० हजार ते १ लाख रोजगार निर्माण होणार होते.
सर्वात महत्वाचा मानला जाणार हा प्रकल्प गुजरातला गेला कसा याबाबत एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलं आहे. त्यावेळी या प्रकल्पासाठी गेल्या दोन वर्षात जो रिस्पॉन्स मिळायला हवा होता, ते कमी पडला असावा. मात्र, नवीन सरकारकडून शक्य तितक्या सर्व सवलती आम्ही देऊ केल्या होत्या. तळेगावजवळील 1100 एकर जमीनही आम्ही देऊ केली होती. 30 ते लाईफ सायन्स 35 हजार कोटींची सवलतीसह सब्सिडी, अन्य बाबी सरकारच्यावतीने ऑफर करण्यात आल्या असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Eknath Shinde | वेदांता प्रकल्प गुजरातला कसा गेला?, एकनाथ शिंदे म्हणाले…
- Ajit Pawar | “वेदांता प्रकल्प गुजरातला जाणं हे महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी आहे”
- Ajit Pawar । राजकीय दबावातूनच वेदांता प्रकल्प गुजरातला; अजित पवारांनी घेतली तातडीने मुख्यमंत्र्यांची भेट
- Chandrakant Patil । विद्यार्थ्यांची वसतिगृहाबाबत गैरसोय होणार नाही असे नियोजन करावे – चंद्रकांत पाटील
- Eknath Shinde । BKC नाही शिवतीर्थावरच होणारा दसरा मेळावा? मुख्यमंत्री शिंदेंच सूचक वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
