Share

Maharashtra Rain Alert | गुरुवारी मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता

Published On: 

🕒 1 min read

राज्यामध्ये नैऋत्य मौसमी पाऊस पुन्हा सुरू झाला असून मुंबईत गुरुवारी ऑरेंज ॲलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह पालघर आणि ठाण्यात देखील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. रविवार ते मंगळवारदरम्यानची मुंबईमध्ये पावसाची दमदार हजेरी होती.

सोमवार सकाळी ८.३० ते मंगळवारी सकाळी ८.३० या २४ तासांमध्ये सांताक्रूझ येथे ९३.४ मिमी, तर कुलाबा येथे ५९.२ मिमी पावसाची नोंद झाली. तर उपनगरांमध्ये रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली. विलेपार्ले अग्निशमन दल येथे १०० मिमी पावसाची सोमवारी रात्रीपासून नोंद झाली. चिंचोली अग्निशमन दल केंद्र येथे ११० मिमी पाऊस नोंदला केला, तर दिंडोशी येथे ९३.६ मिमी पावसाची नोंद झाली. मुंबई, नवी मुंबई येथे अनेक ठिकाणी रात्रभरात पडलेला पाऊस ५० मिमी हून अधिक होता. मंगळवारी दिलेल्या इशाऱ्यानंतर मुंबईत मंगळवारी मुसळधार ते अतिमुसळधार शक्यता वर्तवण्यात आली होती. पावसाच्या जोरदार उपस्थितीमुळे मुंबईतील कमाल तापमानाचा पाराही खाली उतरला आहे.

रायगडमध्ये बुधवार, गुरुवारी ऑरेंज ॲलर्ट, तर रत्नागिरीमध्ये बुधवारी ऑरेंज ॲलर्ट आहे. त्यानंतर दोन्ही जिल्ह्यांमध्ये शनिवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.तसेच सिंधुदुर्गात शुक्रवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

आजही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊसची शक्यता?

मुंबईमध्ये बुधवारीही काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठाण्यामध्ये तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पाऊसही पडू शकतो. तर पालघरमध्ये सुद्धा काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!