मुंबई: महाविकास आघाडी सरकार हे पाणी विरोधी सरकार असून त्यांनी मराठवाडा वॉटर ग्रीड गुंडाळली, कोकणातून मराठवाड्याला पाणी देणाऱ्या योजनेचा शासन निर्णय रद्द केला. औरंगाबादसारख्या शहरला पाणी देता आलेले नाही, असा आरोप करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी औरंगाबाद येथे जलआक्रोश मोर्चाचे नेतृत्व केले. यावरच काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी टीका केली आहे.
“भाजपातर्फे औरंगाबादला जलआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. परंतु २७ वर्षे भाजपाची सत्ता असलेल्या गुजरातमध्ये पाण्याची अवस्था या दोन व्हिडिओमध्ये दिसून येते. औरंगाबादकरांनी भाजपाचा दांभिकपणा पाहून घ्यावा. भाजपा सत्तेत आल्यावर पाणी मिळेल ही “अच्छे दिन” सारखीच घोषणा आहे स्पष्ट आहे.”, असे ट्वीट सचिन सावंत यांनी केले आहे. यामध्ये गुजरातमधील पाणी प्रश्न मांडणारे व्हिडिओही सचिन सावंत यांनी पोस्ट केले आहेत.
१/२ भाजपातर्फे औरंगाबादला #जलआक्रोशमोर्चा काढण्यात आला होता. परंतु २७ वर्षे भाजपाची सत्ता असलेल्या गुजरातमध्ये पाण्याची अवस्था या दोन व्हिडिओमध्ये दिसून येते. औरंगाबादकरांनी भाजपाचा दांभिकपणा पाहून घ्यावा. भाजपा सत्तेत आल्यावर पाणी मिळेल ही "अच्छे दिन" सारखीच घोषणा आहे स्पष्ट आहे pic.twitter.com/17TwYR0KBb
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 24, 2022
“जलयुक्त शिवार नावाने योजना आणून कंत्राटदारांची भर करणाऱ्यांनी करोडो रुपये लुटले. न जलस्तर वाढला ना शिवारात पाणी राहिले ना सिंचन क्षेत्र वाढले. उलट महाराष्ट्रात टँकर वाढले. गुजरातमध्ये मोदीजी सरस्वती नदीला अवतीर्ण करणार होते .नळातून पेट्रोल मिळेल म्हणत होते. आज पाणीही मिळत नाही.”, असा टोला सचिन सावंत यांनी ट्वीट करत लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “…या पायंड्याला पंतप्रधान मोदींनी विरोध करायला हवा”, संजय राऊतांची मागणी
- राजीव गांधींच्या खुन्यांचा सन्मान करून एम. के. स्टॅलिन यांनी काय साध्य केले?; ‘शिवसेने’चा सवाल
- IPL 2022 GT vs RR Qualifier 1 : गुजरात फायनलमध्ये..! मिलरच्या ‘किलर’ खेळीमुळं राजस्थानला पराभवाचा धक्का
- IPL 2022 GT vs RR Qualifier 1 : नशीबवान जोस बटलर..! फायनल गाठण्यासाठी गुजरातसमोर १८९ धावांचं लक्ष्य
- IPL 2022 : यंदाच्या आयपीएल हंगामातील ‘फ्लॉप प्लेइंग ११’, दिग्गज खेळाडूंचा समावेश; वाचा!


