Share

IPL 2022 GT vs RR Qualifier 1 : गुजरात फायनलमध्ये..! मिलरच्या ‘किलर’ खेळीमुळं राजस्थानला पराभवाचा धक्का

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या गुजरात टायटन्सने आपल्या पहिल्याच  प्रयत्नात आयपीएल २०२२ (IPL 2022)च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर रंगलेल्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरातने राजस्थान रॉयल्सचा (GT vs RR) ७ गडी राखून पराभव केला. या सामन्यात हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कप्तान संजू सॅमसनच्या आक्रमक ४७ आणि जोस बटलरच्या ८८ धावांच्या जोरावर राजस्थानने गुजरातला १८९ धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात गुजरातकडून डेव्हिड मिलरने फिनिशरच्या भूमिकेत खेळत गुजरातला ३ चेंडू राखून विजय मिळवून दिला. मिलरला हार्दिकची अप्रतिम साथ लाभली. आता २९ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर म्हणजेच घरच्या मैदानावर  गुजरात संघ फायनल सामना खेळणार आहे.

गुजरातचा डाव

राजस्थानच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातने सलामीवीर वृद्धिमान साहाला शून्ंयावर गमावले. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने त्याला सॅमसनकरवी झेलबाद केले. त्यानंतर मॅथ्यू वेडसोबत शुबमन गिलने ७२ धावांची भागीदारी केली. चांगल्या लयीत खेळणाा शुबमन पॉवरप्लेनंतर धावबाद झाला. त्याने ५ चौकार आणि एका षटकारासह ३५ धावा केल्या. ओबेद मॅकॉयने टाकॉलेल्या १०व्या षटकात वेडने बटलरच्या हाती झेल दिला. त्याने ६ चौकारांसह ३५ धावा केल्या. कप्तान हार्दिक पंड्याने संघाला सावरले. त्याने डेव्हिड मिलरसोबत अर्धशतकी भागीदारी केली. १५ षटकात गुजरातने ३ बाद १३९ धावांपर्यंत मजल मारली. शेवटच्या २ षटकात गुजरातला विजयासाठी २३ धावांची गरज होती. १९व्या षटकात मिलरने आपले अर्धशतक फलकावर लावले. शेवटच्या षटकात गुजरातला विजयासाठी १६ धावा हव्या असताना राजस्थानकडून प्रसिध कृष्णाने गोलंदाजी केली. मिलरने षटकाच्या पहिल्या तीन चेंडूवर तीन षटकार ठोकत गुजरातला फायनलमध्ये पोहोचवले. मिलरने ३८ चेंडूत ३ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ६८ धावा केल्या. हार्दिक २७ चेंडूत ५ षटकारांसह ४० धावांवर नाबाद राहिला.

राजस्थानचा डाव

स्पर्धेत चांगल्या लयीत खेळणाऱ्या यशस्वी जयस्वालला (३) गुजरातचा वेगवान गोलंदाज यश दयालने स्वस्तात झेलबाद केले आणि राजस्थानला पहिला धक्का दिला. त्यानंतर कप्तान संजू सॅमसनने आक्रमक रूप धारण करत फटकेबाजी केली. ऑरेंज कॅपचा मानकरी जोस बटलरला राजस्थानच्या गोलंदाजांनी जखडून ठेवले. या दोघांनी ६८ धावांची भागीदारी केली. १०व्या षटकात फिरकीपटू रविश्रीनिवासन साई किशोरने सॅमसनला फसवले. सॅमसनने २६ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह ४७ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या देवदत्त पडिक्कलनेही २ चौकार आणि २ षटकारांसह २८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. १५व्या षटकात गुजरातच्या कॅप्टनने त्याची दांडी गूल केली. शांत खेळणाऱ्या बटलरला १७व्या षटकात जीवदान मिळाले. पावसामुळे मैदान ओले असल्यामुळे हार्दिक पंड्या बटलरचा झेल घेऊ शकला नाही. याचा फायदा उचलत या षटकात बटलरने यश दयालला ४ चौकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले. शिमरॉ़न हेटमायरलाही आज (४) मोठी खेळी करता आली नाही. मोहम्मद शमीने त्याला १९व्या षटकात तेवतियाकरवी झेलबाद केले. शेवटच्या षटकात राजस्थानला १५ धावा घेता आल्या. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर बटलर धावबाद झाला. त्याने १२ चौकार आणि २ षटकारांसह ८८ धावा केल्या. २० षटकात राजस्थानने ५ बाद १८८ धावा केल्या.

दोन्ही संघांची Playing 11

गुजरात टायटन्स – वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुबमन गिल, मॅथ्यू वेड, हार्दिक पंड्या (कप्तान), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, यश दयाल, अल्झारी जोसेफ, मोहम्मद शमी.

राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कप्तान), देवदत्त पडिक्कल, रवीचंद्रन अश्विन, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, ट्रेंट बोल्ट, प्रसिध कृष्णा, युझवेंद्र चहल, ओबेद मॅकॉय.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!