मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)मध्ये स्पर्धेतील पहिला क्वालिफायर सामना (Qualifier 1) गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) यांच्यात रंगत आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर होणाऱ्या या सामन्यात गुजरातचा कप्तान हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कप्तान संजू सॅमसनच्या आक्रमक ४७ आणि जोस बटलरच्या ८९ धावांच्या जोरावर राजस्थानने गुजरातला १८९ धावांचे आव्हान दिले आहे. बटलरला आज नशिबाची साथ मिळाली. गुजरातकडून त्याला दोनदा जीवनदान मिळाले.
राजस्थानचा डाव
स्पर्धेत चांगल्या लयीत खेळणाऱ्या यशस्वी जयस्वालला (३) गुजरातचा वेगवान गोलंदाज यश दयालने स्वस्तात झेलबाद केले आणि राजस्थानला पहिला धक्का दिला. त्यानंतर कप्तान संजू सॅमसनने आक्रमक रूप धारण करत फटकेबाजी केली. ऑरेंज कॅपचा मानकरी जोस बटलरला राजस्थानच्या गोलंदाजांनी सुरुवातीला जखडून ठेवले. या दोघांनी ६८ धावांची भागीदारी केली. १०व्या षटकात फिरकीपटू रविश्रीनिवासन साई किशोरने सॅमसनला फसवले. सॅमसनने २६ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह ४७ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या देवदत्त पडिक्कलनेही २ चौकार आणि २ षटकारांसह २८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. १५व्या षटकात गुजरातच्या कॅप्टनने त्याची दांडी गूल केली. शांत खेळणाऱ्या बटलरला १७व्या षटकात जीवदान मिळाले. पावसामुळे मैदान ओले असल्यामुळे हार्दिक पंड्या बटलरचा झेल घेऊ शकला नाही. याचा फायदा उचलत या षटकात बटलरने यश दयालला ४ चौकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले. शिमरॉ़न हेटमायरला आज (४) मोठी खेळी करता आली नाही. मोहम्मद शमीने त्याला १९व्या षटकात तेवतियाकरवी झेलबाद केले. शेवटच्या षटकात राजस्थानला १५ धावा घेता आल्या. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर बटलर धावबाद झाला. त्याने १२ चौकार आणि २ षटकारांसह ८९ धावा केल्या. २० षटकात राजस्थानने ५ बाद १८८ धावा केल्या.
Eden Gardens was treated to a Jos classic tonight. ????
Coming up: 20 overs of full force. ????
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 24, 2022
.@josbuttler top scored for @rajasthanroyals in the #TATAIPL 2022 Qualifier 1 & was our top performer from the first innings. ???? ???? #GTvRR
A summary of his knock ???? pic.twitter.com/ZuN709TO3O
— IndianPremierLeague (@IPL) May 24, 2022
दोन्ही संघांची Playing 11
गुजरात टायटन्स – वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुबमन गिल, मॅथ्यू वेड, हार्दिक पंड्या (कप्तान), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, यश दयाल, अल्झारी जोसेफ, मोहम्मद शमी.
राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कप्तान), देवदत्त पडिक्कल, रवीचंद्रन अश्विन, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, ट्रेंट बोल्ट, प्रसिध कृष्णा, युझवेंद्र चहल, ओबेद मॅकॉय.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

