🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मधील साखळी फेरीतील शेवटचा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग यांच्यात खेळला गेला. यंदाच्या हंगामात १० संघांनी सहभाग घेतला आहे. गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स, लखनऊ सुपर जायन्ट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे चार आयपीएलच्या प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. गुणतालिकेत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या गुजरात आणि राजस्थान यांच्यात आज प्लेऑफचा पहिला सामना खेळला जाणार आहे. तर दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स हे संघ आयपीएलच्या पुढील हंगामात चांगले प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करतील. यंदाच्या आयपीएल हंगामात सर्वात खराब प्रदर्शन असलेल्या खेळाडूंची फ्लॉप प्लेइंग ११ बनवली आहे. पाहुयात या संघात कोण कोणत्या दिग्गजांचा समावेश आहे.
फ्लॉप सलामी जोडी
सलामीची फ्लॉप जोडी बनवायची झालं तर, मध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि सनरायझर्स हैदराबाद चा कर्णधार यांचा समावेश असेल. यंदाच्या मोसमात रोहित शर्मा आणि केन विल्यमसन या दोघांनाही त्यांच्या नावाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. रोहितने १४ सामन्यांत १९.१४ च्या सरासरीने २६८ धावा, तर केनने १३ सामन्यांत १९.६४ च्या सरासरीने २१६ धावा केल्या आहेत. या दोन्ही संघांच्या कर्णधाराच्या कामगिरीचा परिणाम संघाच्या प्रदर्शनावरही स्पष्टपणे दिसून आला.
फ्लॉप मध्यक्रम
मध्यक्रमातील फ्लॉप ठरलेल्या फलंदाजांमध्ये चेन्नई सुपर किंग्स, पंजाब किंग्जचा कर्णधार मयंक अग्रवाल आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी यावर्षी आपल्या कामगिरीने सर्वांना निराश केले आहे. मोईन अलीने १० सामन्यांत ८ गडी बाद केले व २४४ धावा केल्या. यामध्ये त्याने फक्त शेवटच्या सामन्यात सर्वाधिक ९३ धावांची खेळी केली. तसेच मयंक अग्रवालने १३ सामन्यांत १६.३३ च्या सरासरीने १९६ धावा केल्या. कर्णधार पदाच ओझ मयंकच्या कामगिरीवरून दिसून आलं. धोनीने यंदाच्या हंगामाची सुरुवात अर्धशतकाने केली मात्र त्यांनतर धोनीला मोठी खेळी करता आली नाही. धोनीने फक्त २३२ धावाच केल्या.
फ्लॉप अष्टपैलू खेळाडू
चेन्नई सुपर किंग चा रवींद्र जडेजा आणि मुंबई इंडियन्सचा कायरन पोलार्ड यांना यंदाच्या हंगामात अष्टपैलू म्हणून चांगली कामगिरी करता आलेली नाही. जडेजाने कर्णधार म्हणून हंगामाची सुरुवात केली पण त्याच्यावरही कर्णधारपदाचे दडपण असल्याचे दिसून आले. जडेजाने यंदाच्या हंगामामध्ये खेळलेल्या १० सामन्यांमध्ये ११६ धावा करत ५ गडी बाद केले. तर दुसरीकडे पोलार्डला ११ सामन्यांमध्ये १४४ धावा आणि फक्त ४ बळी घेतले.
फ्लॉप गोलंदाज
फ्लॉप गोलंदाजांच्या यादीत एका फिरकी आणि तीन वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे. यामध्ये वरून चक्रवर्तीने ११ सामन्यांत ५५.३३ च्या सरासरीने ६ बळी मिळवले. भुवनेश्वर कुमारने ३१.९१ च्या सरासरीने १२ बळी मिळवले. मोहम्मद सिराजने ५५.२५ च्या सरासरीने ८ गडी बाद केले. ह्या गोलंदाजांना यंदाच्या हंगामात छाप पाडता आलेली नाही.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
