Share

‘राहुल गांधींकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख करत मोदींवर टीका; ‘सावरकरांचे लिखाण वाचाल तर..’

Published On: 

🕒 1 min read

थिरुवअनंतपुरम : सध्या काँग्रेस पक्षातंर्गत राजकीय कोलाहल सुरू आहे. पंजाबच्या राजकीय वर्तुळात काँग्रेसमधल्या उलथा-पालथींमुळे कलह निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे मात्र काँग्रेस नेते तथा वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी भाजपाविरोधात टीकास्त्र सुरूच ठेवले आहे. राहुल गांधी सध्या केरळच्या दौऱ्यावर आहे. केरळमधील मलप्पुरम येथे एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा उल्लेख करत भाजपला लक्ष्य केले.

ते म्हणाले, ‘मोदी म्हणतात भारत हा एक प्रदेश आहे. आम्ही म्हणतो भारत म्हणजे लोक आहेत, नातेसंबंध आहेत. ही हिंदूंची मुस्लिमांसोबतची नाती आहेत. मुस्लिम आणि शिखांमधली, तामिळ-हिंदी-उर्दू-बंगालीमधली नाती आहेत. माझा पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत आक्षेप हा आहे की ते ही नाती तोडत आहेत’ अशी टीका राहुल यांनी केली.

तसेच ‘आज राजकीय सवाल विचारला जात आहे की, भारत काय आहे? जर तुम्ही सावरकरांसारख्या लोकांबाबत वाचलं तर ते सांगतात भारत हा भूगोल आहे. ते हातात पेन घेतात आणि भारताचा नकाशा रेखाटतात आणि सांगतात हा भारत आहे. या रेषेच्या बाहेर जे आहे ते भारत नाही अन् या रेषेच्या आतमध्ये जो दिसतोय तो आहे भारत, असे ते सांगतील. म्हणजे काय तर या नकाशाच्या बाहेरचा भारत नाही’ अशा शब्दांत राहुल यांनी सावरकर यांच्यावर टीका केली. दरम्यान, राहुल यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!