मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने अनेक हिंदी चित्रपटात उत्तम काम केले आहे. तिच्या अभिनयाने तिने अनेक प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केल आहे. सध्या ती लंडनमध्ये असून येथे तिने फाइजर या कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. यावेळी तिने लस घेतल्यानंतरचे काही फोटो शेअर केले आहेत. हा फोटो प्रियांका चोप्राने घेतला असल्याचे तिने सांगितले आहे.
https://www.instagram.com/p/CRTsU6dDVn4/?utm_source=ig_web_copy_link
फोटो शेअर करत परिणीतीने लिहिले की, ‘मी लस घेतली आणि काही फोटो घेतले. मला खूप त्रास होतोय,’ अशा आशयाचे कॅप्शन तिने या फोटोंना दिले आहे. सोबत प्रियंका चोप्राने हे फोटो घेतल्याचेही तिने आवर्जुन सांगितले आहे. लस घेतल्यानंतर परिणीती खूश होती. पण नंतर हात दुखू लागल्यानंतर तिचा मूड बदलला असल्याचे दिसत आहे. तिचा हा फोटो सध्या व्हायरल होत असून चाहत्यांनी तिला कमेंट करत काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
नुकताच प्रदर्शित झालेला परिणीतीचा ‘सायना’ या चित्रपटातील अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. परिणीतीने यात सायनाची भूमिका साकारली होती. हा सिनेमा बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिच्या आयुष्यावर होता.
महत्वाच्या बातम्या
- ओबीसी आरक्षणप्रश्नी भुजबळांनी घेतली फडणवीसांची भेट !
- कोरोनाची लागण झालेला तो भारतीय खेळाडू रिषभ पंत?
- ‘…यापेक्षा जास्त मतं कुठल्याही जिमखान्याच्या अध्यक्षाला मिळत असतील’, राणेंनी लगावला मुख्यमंत्र्यांना टोला
- …अन्यथा आमचा लढा पुन्हा सुरु करु, खासदार संभाजी छत्रपतींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- आमिर-किरणचा एकत्र डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल


