Share

‘शेतकऱ्यांवर आस्मानी संकट कोसळलेय, सुलतानी संकट टाळा’, पंकजा मुंडेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Published On: 

🕒 1 min read

बीड : मराठवाडा व बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकारने नुकसान भरपाई तातडीने द्यावी. शेतकऱ्यांवर आस्मानी संकट आले आहे. आता सुलतानी संकट येऊ नये असे म्हणत पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पत्र पाठवले आहे.

पंकजांनी म्हटले आहे की, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. अनेक ठिकाणी ढगफुटी झाली आहे. सर्व प्रकल्प ओव्हरफ्लो झाले असून नद्या दुथडी भरून वाहत आहेत. शेतात पाणी शिरल्याने उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी जीवित आणि वित्तहानी झाली आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीमुळे हिरावला गेला आहे.

मराठवाडा विभागामध्ये अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले आहे. ३५.३६ लाख शेतकऱ्यांची तब्बल २५ लाख हेक्टर शेतजमीन उद्धवस्त झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात ९१ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. पैकी २२ बळी हे सप्टेंबरच्या शेवटच्या दोन दिवसांतील आहेत. आठ जिल्ह्यांमधील ४ हजार ३९० किलोमीटर लांबीचे रस्ते आणि १ हजार ७७ पूल खराब झाले आहेत. ११६ सरकारी इमारती, जिल्हा परिषदांच्या ७१ शाळा आणि २०५ तळ्यांनाही अतिवृष्टीचा फटका बसला आहे. अतिवृष्टीने बळीराजा कोलमडून गेला असून मदतीचा हात देण्याची नितांत आवश्यकता आहे.

बीड जिल्ह्यातही अशीच स्थिती असून पिकांचे नुकसान झाले, त्याची भरपाई मिळायलाच हवी. परंतु, जमिनीही खरडून माती वाहून गेली आहे. त्याची विशेष भरपाई मिळायला हवी. शेतकऱ्यांवर आस्मानी संकट आले आहे आता सुलतानी संकट येणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी असे पंकजा यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!