औरंंगाबाद : चोरलेल्या दुचाकीचा मुळ क्रमांक बदलून त्यावर बनावट क्रमांक टाकत दुचाकीचा रंग, दुसरे स्टिकर लावून दुचाकीचा पूर्ण चेहरा मोहरा बदलून बिनधास्त वापरणाऱ्या तरुणास गुन्हे शाखेने जेरबंद केले. दिपक डिगांबर सोनटक्के (रा. राजनगर, मुकूंदवाडी रेल्वेस्थानकाजवळ) असे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या युवकाचे नाव असल्याची माहिती गुन्हेशाखेचे सहाय्यक आयुक्त रविंद्र साळोखे यांनी शुक्रवारी (दि.१८) दिली.
गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अजबसिंग जारवाल, शेख हबीब, विजय निकम, राजेंद्र साळुंके आदींचे पथक गुरूवारी रात्री गारखेडा परिसरात गस्तीवर होते. त्यावेळी उल्कानगरीतील गुरूजी डेली निडस या दुकानासमोर दिपक सोनटक्के हा दुचाकी क्रमांक (एमएच-२०-एफएम-२४३६) वर उभा असलेला दिसला. दुचाकीवरील रंग, स्टिकरवरून ते बनावट असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी दिपक सोनटक्के याला ताब्यात घेवून दुचाकीच्या कागदपत्राविषयी चौकशी केली असता तो उडवा-उडवीची उत्तरे देत होता.
पोलिसांचा संशय बळावल्याने त्यांनी ई-चलान मशिनच्या सहाय्याने चौकशी केली असता दुचाकीचा मुळ क्रमांक (एमएच-२०-सीएक्स-६२८४) असल्याचे समोर आले. तसेच सदरील दुचाकी सोनटक्के याने मुंडे याच्या मदतीने चोरली असल्याचे समोर आले. दुचाकी चोरल्यानंतर तिच्यावर बनावट क्रमांक टाकून तसेच रंग आणि स्टिकर बदलून वापरत असल्याचे समोर आले. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अजितदादा… हे वागणं बरे नव्हे… आरोग्य कर्मचाऱ्यांवर लाठीचार्ज होणे हे संतापजनक आहे
- बीडमध्ये सध्या आंदोलनाचे वारे; आता २१ जूनला ‘रास्ता रोको’
- ‘१२ वी नापास पण टीका करण्यात अव्वल’ ; केआरकेने पुन्हा एकदा साधला कंगनावर निशाणा
- पहिल्या दिवशी वरुणदेवाने बॅटिंग केल्यामुळे खेळ वाया; दुसऱ्या दिवशीही पावसाची शक्यता
- ‘आम्ही एक महान खेळाडू गमावून बसलो’ ; मोदींनी व्यक्त केल्या भावना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

