Share

‘१७ वर्षांपासूनच्या लढ्याला यश मिळाले’ अर्थसंकल्पानंतर शिवाजीराव आढळराव पाटीलांची प्रतिक्रिया

Published On: 

पुणे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेवरून उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला मंजुरी देण्याची घोषणा केली आहे. पुणे-नगर-नाशिक या जिल्ह्यांतून जाणाऱ्या या २३५ किलोमीटर लांबीच्या प्रकल्पासाठी १६ हजार ३९ कोटींची आवश्यकता आहे. एका बाजुला भूसंपादनाची सर्व तयारी झाली असताना दुसऱ्या बाजुला या प्रकल्पासाठी निधीची तरतूद झाल्याने हा रेल्वे प्रकल्प वेगाने पुढे जाणार आहे. पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पामुळे प्रवासी सेवांसह कृषी उत्पादने आणि मालवाहतुकीला गती मिळणार आहे.

याबाबत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे महाविकास आघाडी सरकारचे अभिनंदन करत ते म्हणाले की, पुणे व नाशिक या दोन्ही जिल्ह्यांच्या कृषी व औद्योगिक क्षेत्राला लाभदायक ठरणाऱ्या या प्रकल्पाची गरज लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकल्पाला मंजूरी दिल्याने या भागातील नागरिकांनी पाहिलेले स्वप्न लवकरच प्रत्यक्षात उतरेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तर गेल्या १७ वर्षांपासून सुरु असलेल्या लढ्याला यश मिळाले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

सातत्याने करत असलेल्या प्रयत्नानंतर अखेर २०१६ मध्ये तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी २४२५ कोटी खर्चाच्या या प्रकल्पाला मंजुरी दिली. त्यानंतर राज्यातील प्रकल्पांच्या कार्यन्वयनासाठी महारेलची स्थापना झाली आणि महारेलतर्फे या प्रकल्पाचे नव्याने सर्वेक्षण होऊन सुरुवातीला ७५००कोटी खर्च असलेल्या प्रकल्पाचे हायस्पीड रेल्वे प्रकल्पात समावेशन होऊन दुहेरी रेल्वेलाईन प्रस्तावित केली. या प्रकल्पाला राज्य शासनाने मंजुरी द्यावी यासाठी फेब्रुवारी २०२० मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मी भेट घेऊन आग्रही मागणी करत प्रकल्पाचे महत्व समजावून सांगितले. त्यास त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानंतर या प्रकल्पाला राज्य सरकारने मान्यता दिली असून ३२०८ कोटीच्या खर्चास मंजुरी दिली आहे. लवकरच या प्रकल्पाची भूसंपादन प्रक्रिया सुरु होऊन पुढील ५-६ वर्षात हा प्रकल्प पूर्ण होईल, असे आढळराव पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!