Share

बालाजी मंदिर संस्थानची शेजमीन हडपणार्‍यावर गुन्हा

Published On: 

परभणी : शहरातील सुभाष रस्त्यावरील बालाजी संस्थानची नांदखेडा रस्त्यावरील जमीन हडप करण्याचा प्रयत्न करण्यासह, सातत्याने जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यावर संस्थानचे महंत अखिलेश्वरदास श्रीवैष्णव यांनी नानलपेठ पोलिस ठाण्यात दिेलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

नितेश देशमुख याच्यासह काही जण सातत्याने धमक्या देत आहेत. सद्यस्थितीत या व्यक्तीने जमिनीवर कब्जा केला आहे. ती शेतजमीन ते वहिती करीत आहेत. जमीन सोडण्याबाबत सातत्याने विनंती केली. मात्र, ती सोडत नाहीत. दहा हजार रुपये एकर या वार्षिक दराने जमीन भाडेतत्वावर वहितीसाठी त्यांनी घेतली, असे सांगतात. परंतू त्याबाबत लेखी कागदपत्र सादर केले नाहीत. जमीन सोडण्याबाबत अखिलेश्वरदास यांनी मागे लागल्यावर संबंधितांनी त्यांना फोनवर शिवीगाळ करत उध्वस्त करून टाकील, अशी धमकी दिली.

बुधवारी सायंकाळी नांदखेडा रस्त्यावरील शेतात जात असताना तीन साथीदारांसह त्यांना थांबवून शेतजमीन माझ्यानावर करून दे, नाही तर मारून टाकील, अशी धमकी दिली. जिवाच्या भीतीने त्यांनी होकार देऊन तेथून स्वतःची सुटका करून घेतली. दरम्यान थेट नानलपेठ पोलिस ठाणे गाठून त्यांच्यासोबत घडलेली परिस्थिती त्यांनी पोलिसांना सांगितली. स्वतः आर्थिक फायद्यासाठी शेत जमीन बळजबरीने कब्जा केली तसेच बदनामी करण्याची धमकी दिली. शिविगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी चार जणांविरूध्द नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास व्यंकट कुसमे हे करीत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!