परभणी : खंडीत केलेला वीजपुरवठा सुरळीत करणार्या वीज वितरणच्या कर्मचार्यास शॉक लागल्याने जखमी झाला आहे. या प्रकरणी अनधिकृत वीजपुरवठा घेतल्याबद्दल संबंधित ग्राहकाविरूध्द नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता पंकज बावळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुसर्या रोहित्रावरील वीजतारेवर अनधिकृत वीजजोडणी करून वीज चोरी केल्यामुळे विद्युत कायदा नुसार गुन्हा दाखल केला आहे.
मोमीनपुरा भागातील शेख मोहमद अखिल मोहमद यांच्याकडे 17 हजार 260 रुपये थकबाकी असल्याने मंगळवारी त्यांचा वीजपुरवठा खंडित केला होता. त्यांनी बुधवारी वीज बिलापोटी दहा हजार रुपये बील भरणा केल्यामुळे त्यांचा वीजपुरवठा पुन्हा जोडून देण्यासाठी महावितरणचे कर्मचारी संजय राठोड व व्यंकटेश मिरकडे हे शेख मोहमद अखिल मोहमद यांचे घरी गेले होते. त्यांच्या घरामधून आलेल्या सर्विस वायरमधून वीजप्रवाह येत संजय राठोड यांना शॉक लागला. त्यामुळे त्यांना तात्काळ दवाखान्यात दाखल करावे लागले होते.
यावेळी घटनेची माहिती समजताच संघटनेचे किशोर गायकवाड, राष्ट्रपाल वाघमारे, सुजाता प्रधान, विष्णू यादव टोम्पे, निरगुडे, पंकज पतंगे आदींनी तातडीने धाव घेतली. त्या ठिकाणची पाहणी केली असता शेख महंमद अखिल महंमद यांनी अनधिकृतपणे वीज तारेवर सर्विस वायर टाकून चेंज ओव्हरमधून वीजपुरवठा घेतल्याचे आढळले. हा वीजपुरठा दुसर्या रोहित्रावरून घेतला होता. चेंज ओव्हर व सर्विस वायर ताब्यात घेतले आहे. शेख महंमद अखिल यांनी अनधिकृत वीजपुरवठा घेत वीज चोरी केली. महावितरणचे 17 हजार 260 रुपयांचे नुकसान केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी नानलपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास कर्मचारी नामदेव हाके हे करीत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- …म्हणून उर्मिला मातोंडकरांनी खास ट्विट करून आदित्य ठाकरेंचं केलं अभिनंदन
- ‘वाझे प्रकरणाचं नागपूर कनेक्शन,’त्या’ व्यक्तीने दिले होते राम मंदिरासाठी १५ कोटी’
- महावितरणच्या मदतीला बळीराजा आला धावून
- राज्यात कोरोनाचे थैमान लवकरच लागणार कडक निर्बंध, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती
- शिवसेनेच्या बाणाने भाजप घायाळ, जळगावात सत्ता हिसकावली !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
