🕒 1 min read
मुंबई : बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या कार्यशाळेत उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत बोलत असताना, महिला वापरत असलेल्या जीन्सबाबात त्यांनी आक्षेप घेतला आहे. ‘आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे सगळं बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत’असं तीरथ सिंह रावत यांनी म्हटलं आहे.
रिप्ड जीन्स संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्या विरोधात अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. त्यांचे हे वक्तव्य कोणालाही न पटणारे आहे. यामुळे आता शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांना चांगलाच टोला लगावला आहे.
त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून रावत यांना फटकारले आहे.’फाटलेल्या जीन्स ला तर या देशातील युवक सांभाळून घेईल पण देशाच्या फाटलेल्या आर्थिक स्थितीला कोण सांभाळणार? असा संतप्त सवाल त्यांनी त्यांच्या ट्वीटमधून मांडला आहे.
मान्यवर… फटी हुई #jeans को तो देश का होनहार युवा संभाल लेगा.. लेकिन फटी हुई #economy का क्या..????????????#RippedJeansTwitter #rippedjeans
— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) March 18, 2021
तसेच याप्रकरणी जया बच्चन यांनी देखील आपल मत व्यक्त केले आहे. त्या म्हणाल्या की, ‘अशी विधाने मुख्यमंत्र्यांना अनुकूल नाहीत. उच्च पदांवर असलेल्यांनी विचार करूनच सार्वजनिक विधान केले पाहिजे. आजच्या काळात आपण अशा गोष्टी बोलतो, त्यावरून आपली मानसिकता लक्षात येते. ही वाईट मानसिकता आहे आणि हीच मानलिकता महिलांवरील अपराधांना प्रोत्साहन देते.’ असे मत त्यांनी यावेळी मांडले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- …म्हणून उर्मिला मातोंडकरांनी खास ट्विट करून आदित्य ठाकरेंचं केलं अभिनंदन
- ‘वाझे प्रकरणाचं नागपूर कनेक्शन,’त्या’ व्यक्तीने दिले होते राम मंदिरासाठी १५ कोटी’
- महावितरणच्या मदतीला बळीराजा आला धावून
- राज्यात कोरोनाचे थैमान लवकरच लागणार कडक निर्बंध, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती
- शिवसेनेच्या बाणाने भाजप घायाळ, जळगावात सत्ता हिसकावली !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
