औरंगाबाद : महानगरपालिका आणि जिल्हा व्यापारी महासंघातर्फे व्यापाऱ्यांसाठी आयोजित कोरोना चाचणी शिबिरात गुरुवारी ६०५ जणांची तपासणी करण्यात आली. पैकी ५७ जण कोरोनाबाधित आढळले आहेत, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, ‘चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अँड ट्रेड’चे (कॅमेट) उपाध्यक्ष अजय शहा, ‘मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्स’चे अध्यक्ष प्रफुल्ल मालाणी, महासंघाचे सचिव लक्ष्मीकांत राठी, सहसचिव जयंत देवळाणकर, उपाध्यक्ष विजय जैस्वाल यांच्यासह व्यापाऱ्यांनी त्यासाठी प्रयत्न केले.
शहरातील विविध भागातील व्यापारी, दुकानातील कर्मचारी यांना सोयीस्कर व्हावे, यासाठी टिळक पथ, पाटीदार भवन, अग्रसेन भवन सिडको, जिजाई हॉस्पिटल पुंडलिकनगर, अपना बाजार आणि शहागंज येथील बालाजी धर्मशाळेत शिबिर सुरु आहेत.
हरविंदसिंग सलुजा, मंगल पटेल, ज्ञानेश्वर खर्डे, अनंत जैस्वाल, कावळे पाटील आणि राजू चिंचाणी शिबिर समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर आणि त्यांच्या पथकाने दिवसभरात ६०५ जणांची कोरोना चाचणी घेतली. यात ५७ जण करोना बाधित आढळून आले आहे, अशी माहिती महासंघाचे सचिव राठी आणि सहसचिव यांनी दिली.
बाधित रुग्णांमध्ये कोणत्याही प्रकारचे लक्षणे आढळून आलेले नाहीत. यात तापडिया नाट्यगृहात २०० मागे १२, जाधव वाडीत ५६ मागे ४, गेंदा भवन येथे ५० मागे १४, राम नगर १२५ मागे ९, जुना मोंढा येथे १०० मागे ९, बालाजी मंदिर येथे ७४ मागे ९ असे एकूण ५७ व्यापारी पॉझिटिव्ह आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘वाझेंमुळे मुंबई पोलिसांची प्रतिमा कलंकित; त्यांच्या मागे कोण याची सखोल चौकशी करा’
- नांदेड विभाग मध्य रेल्वेस जोडा; खासदार फौजिया खान
- शेतकऱ्यांची वीज तोडून सरकारचा ऊर्जामंत्र्यांच्या बंगल्यावर कोट्यवधींचा खर्च : भाजप
- “वाझेंमुळे ‘मातोश्री’ अडचणीत, आता त्यांच्या जीवाला धोका; तातडीने संरक्षण द्या”
- सरकारकडे ऊर्जामंत्र्यांच्या बंगल्याच्या रिनोव्हेशनसाठी पैसे आहेत मग शेतकऱ्यांसाठी का नाहीत?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
