अहमदाबाद : इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला असून या दोन्ही संघांमध्ये टी-२० मालिका सुरु आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेतील आज चौथा सामना खेळवला जात आहे. हा सामना भारतीय संघासाठी महत्वाचा आहे. २-१ अशी आघाडी इंग्लंडने घेतली आहे. त्यामुळे आज भारतीय संघासाठी करो या मरो अशी स्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, पहिल्या दोन सामन्यांसाठी विश्रांती घेतल्यानंतर हिटमॅन रोहित शर्मा खेळण्यास सज्ज झाला आहे. तिसऱ्या सामन्यात १७ चेंडूत १५ धावा करून त्याला माघारी परतावं लागलं होतं. मात्र, या सामन्यात मोठ्या खेळीचा इरादा करून रोहित मैदानात उतरला होता. त्याने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर धडाकेबाज षटकार मारून आक्रमक हेतू इंग्लंडला दाखवून दिला होता.
या षटकाराने रोहितने दोन पराक्रम केले आहेत. पहिला पराक्रम म्हणजे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा रोहित हा फक्त तिसराच फलंदाज ठरला आहे. तर, भारताकडून ट्वेन्टी-२० सामन्यात षटकाराने सुरुवात करणारा रोहित हा पहिलाच खेळाडू ठरला आहे. या दोन पराक्रमांसोबतच त्याने आणखी एक विक्रम केला आहे. भारतीय संघासाठी टी-२० प्रकारात ९ हजार धावांचा टप्पा पार करणारा रोहित दुसऱ्या फलंदाज ठरला आहे.
विराट कोहलीच्या नावावर ९ हजार ६५० हुन अधिक धावांची नोंद आहे. दरम्यान, रोहित शर्मला मोठी खेळी करण्यात अपयश आलं असून त्याने एक चौकार व एक षटकार मारत १२ चेंडूंमध्ये १२ धावा केल्या आहेत. जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीचा सामना करताना चुकीचा शॉट बसल्याने तो झेलबाद झाला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘शाळेत डान्सबार सुरू करण्याची परवानगी द्या’; संस्थाचालकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- इन फॉर्म ईशान किशनला संघातून डावलल्याने चाहत्यांमध्ये नाराजी; कारण आले समोर
- “वाझेंमुळे ‘मातोश्री’ अडचणीत, आता त्यांच्या जीवाला धोका; तातडीने संरक्षण द्या”
- मामाच्या घरी लग्नासाठी आलेली दोन मुले कालव्यात बुडाली
- ‘शुभंमगल’साठी जाताना सावधान! आधार कार्डाशिवाय वऱ्हाडीनांही ‘नो एन्ट्री’


