Share

काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा, औरंगाबाद पोलिसांना हेल्मेट परिधान केलेले वैद्यकीय शिक्षणमंत्री दिसले नाही का?

Published On: 

औरंगाबाद : शहर युवक काँग्रेस तर्फे महागाई विरोधात सायकल यात्रा काढण्यात आली होती. यात शहरातील पदाधिकाऱ्यांसोबत मोठ्या संख्येत कार्यकर्ते ही उपस्थित होते. या यात्रेचे मुख्य आकर्षण असलेले वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी ही हेल्मेट घालून यात्रेत सहभाग नोंदवला होता. कोरोना निर्बंधाचे भंग केले म्हणून सिटी चौक पोलिसांनी शहर युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांवर दोन गुन्हे नोंदवले. मात्र पोलिसांना मंत्री अमित देशमुख दिसले नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे.

औरंगाबादमध्ये गर्दी केल्यामुळे अनेक नेत्यांवर गुन्हे दाखल होत आहेत. या आधी शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे, संदीपान भुमरे, महापौर नंदकुमार घोडेले यांनी कार्यक्रमांना गर्दी जमवली होती. शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांच्यावर तर वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता. मात्र, आपण विकास कामाचे उद्घटन करुन जनतेचेच काम करत असल्याचे स्पष्टीकरण आमदार शिरसाठ यांनी दिले होते. मात्र, आता महागाई विरोधात असलेल्या आंदोलनात मंत्री अमित देशमुख यांनी गर्दी जमवली. कोरोनाचा धोका कायम असताना ही गर्दी टाळता आली नसती का? असा प्रश्न पडतो. त्याहून पोलिसांना यात्रेत सहभागी झालेले अमित देशमुख दिसले नाही का? हा सवाल देखील पोलिसांवर मंत्र्यांचा धाक असल्याचे संकेत देत असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, शहरातील काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह ५० ते ६० कार्यकर्त्यांवर सिटी चौक पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु पोलिसांनी मंत्री अमित देशमुख यांच्यावर उशिरा पर्यंत गुन्हा दाखल केला नव्हता. पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांना या संदर्भात विचारणा केली असता. त्यांनी आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून इतर आरोपी तपासानंतर निष्पन्न होणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे सध्या तरी मंत्री मोहोदय इतर म्हणून गुन्ह्यापासून लांब असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!