Share

तमिळ सुपरस्टार ‘विजय’च्या प्रसिद्ध गाण्यावर थिरकले क्रिकेटपटू; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Published On: 

🕒 1 min read

चेन्नई : सध्या भारतीय संघाचे सर्व खेळाडू अहमदाबादमध्ये सराव करण्यात व्यस्त आहेत. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या २ सामन्यातील प्रत्येकी १ सामना जिंकत भारत आणि इंग्लंड संघ मालिकेत बरोबरीवर आहेत. त्यानंतर २४ फेब्रुवारीपासून या दोन्ही संघात पुढील तिसरा कसोटी सामना रंगणार आहे.

त्यातूनही काही खेळाडू वेळ काढून आपला छंद जोपासताना दिसत आहेत. आर अश्विन, हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादव यांचा एका प्रसिद्ध तमिळ गाण्यावर नाचतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. तमिळ सुपरस्टार विजय थलपती याच्या प्रसिद्ध ‘वाथी कमिंग’ गाण्यावर या भारतीय क्रिकेटपटूंनी ठेका धरला आहे. भारताचा अनुभवी फिरकीपटू अश्विनने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये अश्विनसह अष्टपैलू पंड्या आणि फिरकीपटू कुलदीप अभिनेता विजयच्या ‘वाथी कमिंग’ स्टेपची नक्कल करताना दिसत आहेत.

https://www.instagram.com/p/CLeiAkrn2Jo/?utm_source=ig_web_copy_link

सर्वप्रथम अश्विन ती स्टेप करायला सुरू करतो. त्यानंतर त्याच्याजवळ उभा राहिलेल्या पंड्याला तो ती स्टेप करायला सांगतो. शेवटी कुलदीप त्या दोघांच्या मागून एन्ट्री मारतो आणि नाचू लागतो. अश्विनने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘वाथी आमचा डान्स पाहून नक्कीच खुष झाला असेल!!’ यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. त्यांच्या या व्हिडिओला चाहत्यांनी देखील बरीच पसंती देखील दिली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!