Share

क्रिकेटपटू मिताली राजने मानले पंतप्रधान मोदींचे आभार

Published On: 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ मार्च रोजी आपल्या ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमातून देशाला संबोधित केले. पंतप्रधानांनी आजच्या मन की बातमध्ये विविध क्रीडा प्रकारात ठसा उमटवणाऱ्या खेळाडूंचं अभिनंदन केलं. ते म्हणाले की, मार्च महिन्यात जेव्हा आपण महिला दिन साजरा करत होतो, तेव्हा अनेक महिला खेळाडूंनी पदकं आणि विक्रमांची आपल्या नावावर नोंद केली.

दिल्लीत झालेल्या नेमबाजी स्पर्धेत भारत पहिल्या क्रमाकांवर राहिला. सुवर्ण पदकांमध्येही भारताने बाजी मारली. भारताच्या महिला आणि पुरुष नेमबाजांनी जबरदस्त कामगिरी केली. याचदरम्यान पी.व्ही. सिंधूनेही सिल्व्हर मेडल जिंकलं. मिताली राज या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावा करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला क्रिकेटपटू बनल्या आहेत. त्यांचे ह्या यशाबद्दल खूप खूप अभिनंदन. एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांत 7000 धावा काढणाऱ्या त्या एकमेव आंतरराष्ट्रीय महिला खेळाडू आहेत, असं ते म्हणाले.

आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी महिला क्रिकेटपटू मिताली राज हिच्या कामगिरीबद्दल कौतुक केले. “मिताली राज यांनी, अलीकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा पार केला आहे. असा विक्रम करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला क्रिकेटर बनल्या आहेत. त्यांच्या या उपलब्धतेसाठी त्यांचे खूप-खूप अभिनंदन.  पंतप्रधानांच्या अभिनंदनाबद्दल मिताली राज हिने त्यांचे आभार मानले आहेत. ती म्हणाली की, मी केलेल्या विक्रमाबद्दल नरेंद्र मोदींनी केलेल्या प्रशंसेमुळे मी भारावून गेली आहे. हा माझ्यासाठी खूप मोठा गौरव आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!