मुंबई : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी प्रेक्षकांनी असभ्य वर्तनाचे पुन्हा दर्शन घडले. सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या मोहम्मद सिराजला वर्णद्वेषी टीकेचा सामना करावा लागला आणि त्यानं थेट पंचांकडे तक्रार केली. यावेळी कर्णधार अजिंक्य रहाणेनंही आक्रमक पवित्रा घेताना कारवाईची मागणी केली. त्यामुळे लगेच पोलिसांना बोलावण्यात आले आणि सहा प्रेक्षकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले गेले.
क्रिकेट ऑस्ट्रेलियानंही प्रसिद्धी पत्रक काढून घडलेल्या प्रकाराबद्दल टीम इंडियाची माफी मागितली. भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग यानं त्याचा अनुभव सांगताला ऑस्ट्रेलियात अनेकदा धर्म व रंगांवरून टीका केली गेल्याचे सांगितले. दरम्यान, या घटनेचा अनेक क्रिकेटपटूनी निषेध केला. या प्रकरणावर महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
सचिन तेंडुलकरनं ट्विट केलं की,”खेळ म्हणजे सर्वांना एकत्र आणणे, लोकांमध्ये फूट पाडणे नाही. क्रिकेट कधीही भेदभाव शिकवत नाही. बॅट आणि बॉल यांना केवळ खेळाडूमधलं टॅलेंट समजतं.. त्याच्या धर्म, रंग, जात आणि राष्ट्रीयत्वाशी काहीच संबंध नसतो. ज्यांना हे समजत नाही, त्यांच्यासाठी स्टेडियममध्ये जागा नाही.”भारतीय खेळाडूंवरील वर्णद्वेषी शेरेबाजाची ICCकडून दखल; अहवाल मागवला.
SPORT is meant to UNITE us, not DIVIDE us.
Cricket never discriminates. The bat & ball recognizes talent of the person holding them – not race, colour, religion or nationality. Those who don’t understand this have NO PLACE in a sporting arena.@ICC @BCCI @CricketAus #racism
— Sachin Tendulkar (@sachin_rt) January 10, 2021
दरम्यान, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी टेस्ट ब्रिस्बेनमध्ये होणार आहे. टीम इंडिया ब्रिस्बेनमध्ये जाणार आहे की नाही? याबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही. या टेस्टमुळे भारत विरुद्ध इंग्लंड ही टेस्ट सीरिज अडचणीत येऊ शकते, अशाही बातम्या आहेत. टीम इंडियाचा या विषयावर अधिकृत निर्णय अजून जाहीर झालेला नाही.
महत्वाच्या बातम्या
- …तर ओबीसी आरक्षणातच मराठा समाजाचा समावेश करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी
- ‘अशोक चव्हाणांचे रक्त मराठ्याचे नाही, ते मराठाच नाहीत’
- अजित पवारांचं रक्त सळसळत नाही का ? नरेंद्र पाटलांची बोचरी टीका
- ‘सुरक्षा हटवल्याबद्दल आभार ! राज्य सरकारने हीच सुरक्षा जनतेला आणि महिलांना द्यावी’
- हे अजिबात खपवून घेतलं जाणार नाही… वर्णद्वेषावरून कोहलीनं ऑस्ट्रेलियाला खडसावलं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

