मुंबई: राज्यात गेल्या महिन्यापासून कोरोना (Corona) रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. त्याच सोबत ओमायक्रॉनचे (Omicron) देखील रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात कडक निर्बंध लागू केले. तसेच शाळा देखील बंद (School Closed) करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र आता शाळा पुन्हा सुरू करण्यात यावी अशी मागणी होत असल्याने त्यावर चर्चा होत आहे.
विद्यार्थी पालकांसह शिक्षकांनीही सरसकट शाळा बंद विरोधात सोशल मीडियावर मोहीम सुरू केली आहे. शाळा बंद करण्यापेक्षा नियोजन करून शाळा सुरू ठेवाव्या, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्यासंबंधी सरकार निर्णय घेणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान आता शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी याबाबत महत्वाची माहिती दिली आहे.
वर्षा गायकवाड शाळा सुरू करण्याबाबत बोलताना म्हणाल्या, तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी असेल तिथे स्थानिक पातळीवर निर्णयाचे अधिकार द्यावेत असा मुद्दा मांडण्यात आला. त्यानुसार आम्ही मुख्यमंत्र्यांकडे तसा प्रस्ताव सादर केला आहे. येत्या सोमवारपासून शाळा सुरु कऱण्याचा विचार करावा असं प्रस्तावात सांगण्यात आलं आहे. स्थानिक पातळीवर आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन हा निर्णय घेतला जावा. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे (CM Uddhav Thackeray) फाईल पाठवली असून सकारात्मक प्रतिसाद येईल अशी अपेक्षा आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिली.
महत्वाच्या बातम्या:
टेनिसपटू सानिया मिर्झाने जाहीर केली निवृत्ती! म्हणाली, “हा माझा…”
Bigg Boss 15 : देवोलीनाने अभिजीत बिचुकलेच्या कुटुंबीयांना केलं इग्नोर
सोयगावातील शिवसेनेचा विजय ‘विश्वासाचा’; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘नेतृत्वाचा’-अब्दुल सत्तार
पारधी समाजाच्या २२ वर्षीय तरुणाचा भाजपला धक्का; यवतमाळ नगरपंचयातीवर फडकला भगवा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

