मुंबई : छोटया पडद्यावरील बिग बॉस १५ (bigg-boss 15) हा शो लोकप्रिय असून मनोरंजन तसेच वाद-विवाद यामुळे अधिक प्रसिध्द आहे. नुकतच या घरातील स्पर्धक देवोलीनाची (Devoleena bhattacharjee) अभिजीतच्या (Abhijit Bichukale) कुटुंबाला (family) न भेटणे युजर्सना आवडले नाही. सर्व स्पर्धकांनी बिचुकले यांच्या कुटुंबाचे कौतुक केले, त्यांच्या मुलांना खूप गोंडस म्हणून संबोधले. मात्र देवोलीनाने दुर्लक्ष (Ignored) केल्यामुळे तिच्या टीका केली जात आहे.
दरम्यान, देवोलीना आणि अभिजीतमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. त्या घटनेपासून दोघांमधील बोलणे बंद झाले आहे. जेव्हा अभिजीतचे कुटुंबीय एपिसोडमध्ये आले तेव्हा देवोलिना खोलीत गेली होती. सर्वांनी अभिजीतच्या कुटुंबीयांची भेट घेतली. मात्र देवोलिना तिचा मेकअप करण्यात व्यस्त होती. प्रतीक सहजपाल आणि रश्मी देसाई यांनी वारंवार फोन करूनही देवोलिना बाहेर आली नाही.
https://www.instagram.com/p/CYySZ52oWAS/?utm_source=ig_web_copy_link
रश्मीने अभिजीतच्या पत्नीला विचारले की, बिचुकले सारख्या माणसाला इतकी वर्षे कसे सहन केले? अभिजीतच्या पत्नीला देवोलीनाला भेटायचे होते. तिला पती अभिजीतच्या वतीने खुलासा करायचा होता. अभिजीतच्या पत्नीने घरातील सर्व सदस्यांसमोर आपल्या पतीबद्दल सांगितले की, ते कधीही कोणत्याही मुलीकडे वाईट नजरेने पाहत नाहीत. सर्व स्पर्धकांनी बिचुकले यांच्या कुटुंबाचे कौतुक केले.
चाहत्यांच म्हणणं आहे की, देवोलीनाने अभिजीतच्या कुटुंबाला प्रेरणा दिली. देवोलीना आणि अभिजीत एकेकाळी चांगले मित्र होते. बिग बॉस १५ मध्ये, स्पर्धकांची त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी ओळख करून दिली जात आहे. शेवटच्या एपिसोडमध्ये अभिजीत बिचुकले त्याची पत्नी, मुले आणि आईला भेटले. मात्र देवोलीनाने अभिजीतच्या कुटुंबीयांना भेटण्यास स्पष्ट नकार दिला होता. देवोलीनाची अभिजीतच्या कुटुंबाला न भेटणे युजर्सना आवडले नाही. यामुळे त्यांच्यातील वाद मिटणार की नाही याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.
महत्वाच्या बातम्या:
बदनापूर नगरपंचायतीत भाजपने ‘असा’ दिला महाविकास आघाडीला शह; नगराध्यक्षाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार?
देवगड नगरपंचायत निवडणूकीत नितेश राणेंना मोठा धक्का; भाजपने गमावली सत्ता!
“हे आर आर आबांचं रक्त!”, अजित पवारांचा रोहित पाटलांवर कौतुकाचा वर्षाव; सुप्रिया सुळे भावूक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

