Share

टेनिसपटू सानिया मिर्झाने जाहीर केली निवृत्ती! म्हणाली, “हा माझा…”

Published On: 

ऑस्ट्रेलियन ओपन २०२२ मध्ये महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीत पराभूत झाल्यानंतर भारताची प्रसिद्ध महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने बुधवारी तिच्या निवृत्तीची घोषणा केली. पराभवानंतर, सानिया मिर्झाने घोषित केले की २०२२ हा तिचा दौर्‍यावरील शेवटचा हंगाम असेल आणि तिला तो पूर्ण करायचा आहे.

सानिया मिर्झा २००३ पासून व्यावसायिक टेनिस खेळत आहे. या हैदराबादच्या टेनिसपटूला खेळून १९ वर्षे झाली आहेत. ती यापूर्वी दुहेरीत प्रथम क्रमांकावर होती. यासह तीनेआपल्या कारकिर्दीत ६ ग्रँड स्लॅम जेतेपदे पटकावली आहेत. मिर्झाची एकल कारकीर्दही खूप नेत्रदीपक राहिली आहे. २००७ च्या मध्यात ती जागतिक क्रमवारीत २७ व्या स्थानावर होती. यामुळे ती भारताची सर्वोच्च रँकिंग महिला खेळाडू बनली.

“हा माझा शेवटचा सीझन असेल हे मी ठरवले आहे. मला हा पूर्ण सीझन खेळायचा आहे. पण तोवर मी टिकेल की नाही माहित नाही”, असं सानिया मिर्झाने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत सांगितले.

सानिया मिर्झा म्हणाली, “मला वाटते, माझा मुलगा तीन वर्षांचा आहे. मी त्याच्याबरोबर इतका प्रवास करून त्याला धोक्यात आणत आहे, हे मला लक्षात घेतले पाहिजे. माझे शरीर साथ देत नाहीये. आज माझा गुडघा खरोखरच दुखत होता आणि त्यामुळेच आम्ही हरलो असे मी म्हणत नाही पण मला वाटते की जसजसे माझे वय वाढत आहे तसतसे बरे होण्यास वेळ लागतो आहे.”

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!