औरंगाबाद : शाहगंजस्थित लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यासह आमदार, नगरसेवक उपस्थित होते. यावेळी भाषण करतांना चंद्रकांत खैरे यांनी थेट उद्यापासून सायंकाळी चार पर्यंतच मार्केट उघडे राहणार असल्याचे सांगताच उपस्थितांच्या भुवया चांगल्याच उंचावल्या.
अनेक दिवसांपासून झाकलेल्या स्थितीत असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या अनावरण समारंभाला अखेर सोमवारी मुहूर्त लागला. सुरुवातीला या समारंभाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार होते. परंतु कोरोना परिस्थितीचा दाखला देत त्यांनी पालकमंत्री सुभाष देसाई आणि पुतळ्यासाठी तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरे यांनी ४० लक्ष विकासनिधी दिल्यामुळे त्यांच्या हाताने लोकार्पण करण्याच्या सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.
दरम्यान, समारंभाप्रसंगी भाषणात बोलतांना माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मराठवाडा मुक्ती संग्रमांचे किस्से उपस्थितांना सांगत, लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची मराठवाडा मुक्त करण्याची त्यांनी सांगितली. यावेळी मंचावर पालकमंत्री सुभाष देसाई, आ. अतुल सावे, आ. दानवे, आ. जैस्वाल जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडे यांची उपस्थिती होती. खैरेंनी भाषण संपविण्याआधीच मंगळवारपासून सायंकाळी चारला मार्केट बंद होणार असल्याची घोषणा करताच, जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीआधी खैरेनी घोषणा केल्यामुळे व्यापारी वर्गात चांगलीच चर्चा होताना दिसून आली.
महत्वाच्या बातम्या
- ‘विजय वडेट्टीवार यांना दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाचं खातं द्यायला हवं होतं, मात्र…’
- पुण्यात उद्यापासून नियम आणखी कडक; जाणून घ्या आज किती रुग्ण संख्या
- औरंगाबादकरांसाठी आनंदाची बातमी; कोरोना रुग्ण संख्येत कमालीची घट
- ‘तो वाघ आमच्या इशाऱ्यावर चालतो’; विजय वडेट्टीवारांचा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला
- ‘सत्तेचा माज किती असू शकतो त्याचे हे जिवंत उदाहरण’; भातखळकरांचा संताप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

