पुणे : एकाबाजूला ऑलिम्पिकची तयारी जगभरात जोरदार सुरु आहे. देशातील विविध क्रीडा प्रकारांचे खेळाडू देखील कसून सर्व करत असून यंदा देशासाठी अधिक पदकं आणावीत यासाठी घाम गाळत आहेत. भारतात आधीच विविध क्रीडाप्रकारांसाठी योग्य प्रशिक्षण आणि सोय नसल्याने खेळाडूंना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. आता खेळाडूंसाठी विविध सोयी करण्यासाठी पुढाकार घेतला जात असतानाच पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
म्हाळुंगे बालेवाडी परिसरात उभारल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठात सुमारे 5 कोटी रुपये खर्च करून हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिंथेटिक ट्रॅक उभारला आहे. पण, या ट्रॅकवरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार आणि राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्या गाड्या उभ्या करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
MH is a sorry "state" of affairs..
Zero respect for covid protocols,law and order,tax payer..
Show me one political party with the right intent.
Protest march for the naming of an airport in Navi Mumbai,
The morcha for reservation at dahisar toll naka,
Or this ???????? https://t.co/U0wkBiCKbz
— Sumeet Raghvan सुमीत राघवन (@sumrag) June 28, 2021
सुमारे 5 कोटी रुपये खर्च करून हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिंथेटिक ट्रॅक उभारला गेला आहे. महत्वाचं म्हणजे, खेळाडूंच्या सरावा व्यतिरिक्त इथं पायी चालण्याचीही परवानगी नसते. हे माहीत असून देखील, आलेल्या मंत्र्यांचे दोन मजले चढण्याच श्रम वाचावं आणि आपल्याला शाबासकी मिळावी यासाठी क्रीडा अधिकाऱ्यांनी केलेल्या या करामतीमुळे क्रीडा विभागाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
यावर, आता सिनेअभिनेता सुमित राघवन याने संताप व्यक्त केला आहे. सुमित राघवन याने पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात घडलेल्या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत ट्विट केले आहे की, ‘महाराष्ट्र हे एक खेदजनक राज्य आहे, कोरोनाचे नियम असतील, कायदा सुव्यवस्था असेल किंवा करदाते असतील, यांचा अजिबात आदर राखला जात नाही.’ तसंच, नवी मुंबईतील विमानतळासाठी नामकरणावर मोर्चे काढले जात आहे. दहीसर टोलनाक्यावर आंदोलन केले जात आहे. आणि आता खेळाडूंच्या ट्रॅकवर नेत्यांच्या गाड्या उभ्या राहत आहे, असंही राघवन म्हणाला आहे.
महत्वाच्या बातम्या
- जडेजाबद्दलचा विराटचा ‘हा’ निर्णय चुकीचा होता ; सचिन तेंडुलकरचं मोठं वक्तव्य
- पुण्यात उद्यापासून नियम आणखी कडक; जाणून घ्या आज किती रुग्ण संख्या
- औरंगाबादकरांसाठी आनंदाची बातमी; कोरोना रुग्ण संख्येत कमालीची घट
- ‘तो वाघ आमच्या इशाऱ्यावर चालतो’; विजय वडेट्टीवारांचा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला
- मंत्री पदाबाबत जाहीरपणे नाराजी व्यक्त करणाऱ्या विजय वडेट्टीवारांचं ‘ते’ दुखणं तसं जुनेच आहे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

