Share

भारतीय संघावर टीका करणाऱ्यांना जडेजाने सुनावले, म्हणाला..

Published On: 

दुबई: ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी भारतीय संघाने दणकेबाज फटकेबाजी केली. रवींद्र जडेजाच्या प्रभावी फिरकीनंतर के. एल. राहुलने १९ चेंडूंत ५० धावा पटकावल्या. आणि भारताने स्कॉटलंडचा तब्बल आठ गडी आणि ८१ चेंडू राखून पराभव केला. या सामन्यात रवींद्र जडेजा सामनावीरचा मानकरी ठरला.

यावेळी प्रतिक्रिया देताना भारताचा ऑलराउंडर रवींद्र जडेजानं टीकाकारांना चांगलच सुनावलं आहे. गेल्या तीन वर्षांपासून एक संघ म्हणून आम्ही सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहोत. मग ती देशांतर्गत असो वा विदेशात. आम्हाला कदाचित काही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करता आली नसेल. पण त्यावरूनच आम्हाला जोखणं चुकीचं आहे, अशा शब्दांत रवींद्र जडेजानं टीकाकारांना ठणकावलं आहे.

दरम्यान यंदाच्या टी-२० वर्ल्डकपमध्ये सुरुवातीला पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यांमध्ये पराभवाचा धक्का बसलेल्या भारतीय संघावर चाहते आणि विश्लेषकांनी टीका करायला सुरुवात केली होती. मात्र, त्यानंतर अफगाणिस्तान आणि स्कॉटलंडविरुद्धच्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय संपादित केले आहेत. स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यामध्ये रवींद्र जडेजानं फक्त १५ धावांच्या मोबदल्यात स्कॉटलंडचे तीन गडी बाद केले. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. तर भारतानं स्कॉटलंडवर विजय मिळवत आपल्या सेमीफायनलमध्ये जाण्याच्या आशा अजूनही जिवंत ठेवल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!