मुंबई: शिवसेना नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावातल्या एका कार्यक्रमात चक्क कव्वाली गात रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. यावेळी त्यांनी ‘चढता सुरज धीरे धीरे’ ही अजरामर कव्वाली गायली. गुलाबराव पाटील यांना सभा गाजवणारे नेते म्हणून ओळखले जाते. मात्र यावेळी त्यांनी ‘चढता सुरज धीरे धीरे’ ही अजरामर कव्वाली गात आपल्यातील नवा हुनर त्यांनी दाखवून दिला. मात्र आता यावरच भाजप नेते नितेश राणे यांनी ट्वीट करत गुलाबराव पाटील यांच्यावर निशाना साधला आहे.
सुपारी चोर गुलाब पाटीलसाठी हा योग्य कार्यक्रम आहे. इतर वेळेला कुत्र्यासारखं भुंकण्यापेक्षा या भाडखाऊ गुलाबाने कव्वाली गात राहावी, असं सगळं बघून स्वर्गीय बाळासाहेबांची आठवण जास्त येते, आता शिवसेनेची वाटचाल काँग्रेस आणि एमआयएम पक्षाच्या दिशेने जोरदार सुरू असल्याचे म्हणत त्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
सुपारी चोर गुलाब पाटीलसाठी हा योग्य कार्यक्रम आहे. इतर वेळेला कुत्र्यासारखं भुंकण्यापेक्षा या भाडखाऊ गुलाबाने कव्वाली गात राहावी, असं सगळं बघून स्वर्गीय बाळासाहेबांची आठवण जास्त येते, आता शिवसेनेची वाटचाल काँग्रेस आणि MIM पक्षाच्या दिशेने जोरदार सुरू आहे. https://t.co/iPjL0R8olD
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 6, 2021
दरम्यान नितेश राणे यांच्या ट्वीटमुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर नितेश राणे यांनी गुलाबराव पाटील यांच्या कव्वाली गायनावरून शिवसेना भविष्यात एमआयएम पक्षाच्या दिशेने जाऊ शकते, असे भाकीत त्यांनी ट्वीट करत वर्तविले आहे.
महत्वाच्या बातम्या
- स्कॉटलंडवर भारताचा दणदणीत विजय
- भारतीय संघावर टीका करणाऱ्यांना जडेजाने सुनावले, म्हणाला..
- ‘शिवसेनेला दुसऱ्यांच्या मुलांचं बारसं करण्याची सवय’, नारायण राणेंचा हल्लाबोल
- मराठी माणसाच्या भरवश्यावर राजकारण करायचे आणि तो संकटात आल्यावर त्याला उघड्यावर सोडायचे – गोपीचंद पडळकर
- ‘…तर डोक्याविना संजय राऊत दिसतील तिथे’, नारायण राणेंचा खोचक शब्दांत इशारा


