Share

‘…तर डोक्याविना संजय राऊत दिसतील तिथे’, नारायण राणेंचा खोचक शब्दांत इशारा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या दादरा-नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये दिवंगत मोहन डेलकर यांच्या पत्नी कमला डेलकर विजयी झाल्या. याच पार्श्वभूमीवर यासंदर्भात ट्विट करत शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी आनंद व्यक्त केला आहे. परंतु, या मुद्द्यावरून आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपा खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊतांना खोचक शब्दांमध्ये इशारा दिला आहे.

पत्रकार परिषदेत बोलत असतांना राऊतांवर निशाणा साधत राणे म्हणाले की,’दादरा-नगर हवेलीची अपक्ष उमेदवाराने जिंकली. शिवसेनेने डंका सुरू केला की राज्याच्या बाहेर आम्ही जिंकलो. मुद्दाम मी त्या उमेदवाराची निशाणी मागवून घेतली. ती फलंदाज बॅट घेऊन उभा असल्याची आहे. पण दुसऱ्यांच्या मुलाचे बारसे करायची सवय शिवसेनेला आहेच. शिवसेना आम्हाला यश मिळालं, आता दिल्ली काबीज करणार म्हणतेय. मोदींचं सरकार ३०३ जागांसह बहुमतात आहे. तुम्ही एका जागेनिशी धडक मारणार म्हणताय. पण धडक कशी असते हे तुम्हाला माहिती नाही. दिल्लीला धडक मारायला आलात तर डोकं राहणार नाही जागेवर. डोक्याविना संजय राऊत दिसतील तिथे’, असे राणे यावेळी म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’एक तर तुम्ही जे ५६ आमदार आहात, ते मोदींमुळेच निवडून आलेला आहात. नाहीतर आठच्या वर जात नाहीत तुम्ही. अनेक वृत्तपत्रांनी केलेल्या अभ्यासात आठच आकडा होता. मोदींशी आधी युती केली आणि नंतर गद्दारी केली. त्यानंतर मुख्यमंत्रीपद मिळाले. सध्या आकसापोटी मोदींवर टीका केली जात आहे. मोदींमुळे यांचे ५६ आणि १८ निवडून आले. पुढच्या लोकसभेला यांचे २५ आणि आठही निवडून येणार नाहीत अशी अवस्था आहे. त्यामुळे तोपर्यंत हात धुवून घ्या अस चाललंय.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!