🕒 1 min read
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्हा बँक बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्यासंबंधी नितेश राणे आज कणकवली दिवाणी न्यायलयात उपस्थित झाले. ता. १८ डिसेंबर २०२१ रोजी संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर कणकवली येथे हल्ला झाला होता. याप्रकरणी आमदार नितेश राणे (Nitesh Rane) वादाच्या भोवऱ्यात अडकले होते.
संतोष परब यांच्यावरील जीवघेणा हल्ला प्रकरणात नितेश राणे यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर राणेंनी सुप्रीम कोर्ट आणि मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळला होता. शेवटी राणेंनी त्यांचा उच्च न्यायालयातील जामीन अर्ज ही मागे घेतला आहे. यावर प्रकरणावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले होते की, नितेश राणे यांनी कोर्टात शरणागतीचा कोणताही अर्ज केलेला नाही. जोपर्यंत शरण येत नाहीत तोपर्यंत जामीन अर्जासाठी पात्र होता येत नाही. जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत जामीन मिळत नाही, असं परब म्हणाले होते.
दरम्यान आमदार नितेश राणे आज पत्रकारांशी बोलले होते. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘आतापर्यंत राज्यसरकारने बेकायदेशीर पद्धतीने मला अटक करण्याचा प्रयत्न केला, मात्र आता मी कोर्टाच्या निर्णयाचा आदर ठेऊन स्वतः सरेंडर होण्यासाठी कोर्टात जात आहे.’ त्यानंतर ते सिंधुदुर्गच्या कणकवलीच्या दिवाणी न्यायलयात सरेंडर झाले होते. आता त्यांना चार फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
-
“ठाकरेंच्या सांगण्यावरून वाझेंची नेमणूक…” परमवीर सिहांचा धक्कादायक खुलासा
-
‘भारताने अर्थव्यवस्थेच्या बळावर जगाचे लक्ष वेधले’; पंतप्रधान मोदींचे वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
