Share

“ठाकरेंच्या सांगण्यावरून वाझेंची नेमणूक…” परमवीर सिहांचा धक्कादायक खुलासा

Published On: 

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सांगण्यावरूनच त्यांनी सचिन वाझेला पुन्हा कामावर घेतले होतं, असा खुलासा त्यांनी ईडीला दिलेल्या स्टेटमेंटमध्ये केला आहे. ईडीने त्यांना सचिन वाझेला पुन्हा कामावर घेण्याचे कारण विचारले होते, त्याला उत्तर म्हणून त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

ते म्हणाले, ‘सचिन वाझेला जून २०२० मध्ये पुन्हा कामावर रुजू करण्यात आले होते. त्याआधी त्यांच्या सस्पेंशनची आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला पोलीस आयुक्तांसह काही सहाय्यक पोलीस आयुक्त उपस्थित होते. वाझेला कामावर घेण्याची कारणे त्या बैठकीच्या रिपोर्ट मध्ये दिलेली आहेत. पण मी सांगू इच्छीतो की माझ्यावर अनिल देशामुखांकडून वाझेला कामावर रुजू करून घेण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता. नंतर मला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंकडून सुद्धा याच प्रकारचा दबाव आला. पुढे मला वाझेला क्राईम ब्रांचमध्ये पाठवण्यासाठी आणि इतर महत्वाची खाती देण्यासाठी सातत्याने दबाव येत राहिला. अनेक महत्वाच्या केसेस मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या सांगण्यावरून वाझेकडे सोपवण्यात आल्या. वाझेला त्या दोघांकडून थेट आदेश येत होते. मी हे ही सांगू इच्छितो, की सचिन वाझेला कामावर पुन्हा रुजू करण्यासाठी अनिल देशमुखांनी २ कोटींची मागणी सचिन वाझेकडे केल्याचे सचिन वाझेनी माझ्या सामोर मान्य केले आहे.’

सचिन वाझे आणि परमवीर सिंहचा वाद आतापर्यंत फक्त अनिल देशमुखांशी जोडला जात होता. आता मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे या प्रकरणी नाव घेऊन परमवीर सिहांनी नवे वळण दिले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!