🕒 1 min read
मुंबई: काल (१ फेब्रुवारी)केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी चौथ्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी कर रचनेत बदल करून अर्थमंत्री दिलासा देतील अशी सर्वच देशवासीयांना अपेक्षा होती. मात्र सलग सहाव्या वर्षी कोणताही बदल न झाल्याने नोकरदार वर्गाच्या पदरी निराशा पडली. मात्र कॉर्पोरेट क्षेत्राला सीतारामन यांनी काहीसा दिलासा दिला. या दोन्ही क्षेत्रांना अगोदर १८ टक्के कर भरावा लागायचा मात्र आता या दोन्ही क्षेत्रांना १५ टक्के कर भरावा लागणार आहे. दरम्यान यावरूनच काँग्रेस नेते भाई जगताप (Congress leader Bhai Jagtap) यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे.
“अदानी-अंबानी आणि त्यांच्यासारख्या कॉर्पोरेट घराण्यांना उपासमारीने जीवाला धोका निर्माण झाल्यामुळे कॉर्पोरेट टॅक्स १८% वरून १५% करण्यात आला.”, अशी खोचक टीका भाई जगताप यांनी केली आहे.
अदानी-अंबानी आणि त्यांच्यासारख्या कॉर्पोरेट घराण्यांना उपासमारीने जीवाला धोका निर्माण झाल्यामुळे कॉर्पोरेट टॅक्स १८% वरून १५% करण्यात आला… ???? ????#बजेट२०२२
— Bhai Jagtap – भाई जगताप (@BhaiJagtap1) February 2, 2022
दरम्यान सहकार आणि कॉर्पोरेट या दोन्ही क्षेत्रांना १५ टक्के कर भरावा लागणार आहे. (Corporate and co-operative sector will have to pay 15 per cent tax) याशिवाय सरचार्जदेखील १२ टक्क्यांवरून ७ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. तसेच इन्कम बेस १ कोटीवरून १० कोटी करण्यात आला आहे. त्यामुळे लॉन्ग टर्म कॅपिटल गेनवर आता १५ टक्के कर द्यावा लागणार आहे.
तसेच क्रिप्टोकरन्सी संदर्भात सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यात २०२२-२३ मध्ये आरबीआय स्वत:चे डिजिटल चलन आणेल अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. या घोषणेचा मोठा प्रभाव शेअर मार्केटवर दिसून आला. मुंबई शेअर मार्केट १ हजार अंकांनी वधारला असून मार्केटने ५९ हजार अंकांचा टप्पा ओलांडला आहे. तर क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून होणाऱ्या उत्पन्नावर ३० टक्के कर लागेल.
महत्वाच्या बातम्या:
- अनिल देशमुखांचा मोठा खुलासा; म्हणाले, “अनिल परब द्यायचे पोलीस बदल्यांची यादी”
- समय बडा बलवान है | इंसान खामोखा गुरूर करता है|
- भारतीय क्रिकेट नियामक मंडळ खेळवणार डे अँड नाईट टेस्ट
- ‘तीन कोटी गरीब लखपती झाले’; अर्थसंकल्पानंतर मोदींचे वक्तव्य
- मोदी सरकार महिला विरोधी असल्याचे यंदाच्या अर्थसंकल्पातून पुन्हा सिद्ध झाले; महिला काँग्रेसची टिका!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
