🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात कोरोनाने पुन्हा एकदा कहर घातला आहे. मागील वेळेपेक्षा ही लाट अधिक गंभीर असल्याने रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर व इतर औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण होणे गरजेचं आहे.
दरम्यान, १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील सर्वांसाठी देखील लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. Co-win आणि Arogyasetu या सरकारी ऍपवर नोंदणी करून लसीकरण होईल असं सांगण्यात आलं असलं तरी ४५ वर्षांपुढील व्यक्तींना लस घेण्याआधी नोंदणी अनिवार्य नव्हती. त्यांना थेट लस देण्यात येत होती. मात्र आता १८ वर्षांपुढील सर्वांचे लसीकरण सुरु झाल्यानंतर लसींचा मोठा तुटवडा निर्माण होऊ शकतो. म्हणून ऐनवेळी लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी आता Co-win किंवा आरोग्यसेतूवर पूर्वनोंदणी करणाऱ्यांनाच लस देण्यात येईल, असं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
कशी व कधीपासून करता येईल रजिस्ट्रेशन (नोंदणी) करता येईल ?
28 एप्रिलला नोंदणी सुरू होणार असल्याचं सरकारनं स्पष्ट करण्यात आलं आहे. लसीकरणाबाबात इतरही काही महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. 1 मे पासून लसीकरण केलं जाणार आहे. त्यासाठी स्वतःची नोंदणी करणं गरजेचं आहे. तसंच 18 ते 45 वयोगटातील नागरिकांसाठी ऍडव्हान्स अपॉइंटमेंट घेता येईल. मात्र कोणालाही जाऊन नोंदणी न करता थेट लसीकरण करून घेता येणार नाही. रजिस्ट्रेशन cowin.gov.in आणि Aarogya Setu ऍपवर करता येईल अशीही माहिती देण्यात आली आहे. भारत सरकारच्या MyGovIndia या ट्विटर हँडलवर सरकारनं ही माहिती दिली आहे.
राज्यात मोफत लसीकरण होणार ?
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी राज्यात १८ वर्षांपुढील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यावर मंत्रिमंडळाचे एकमत असल्याचे भाष्य केले आहे. राज्य सरकार आपल्या तिजोरीतून हा कार्यक्रम घेणार असून यासाठी ग्लोबल टेंडर काढून १५ कोटी लसींची व्यवस्था करणार असल्याचे मलिक यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देखील यासाठी होकार आहे. लवकरच हे टेंडर काढलं जाईल, अशी माहिती नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्राला इतर राज्यांपेक्षा दुप्पट ऑक्सिजन; फडणवीसांनी मानले मोदींचे आभार
- जयंत पाटील हे अनिल देशमुख यांच्या घराचे वॉचमन आहेत का? – निलेश राणे
- शरद पवारांच्या आवाहनाला ‘या’ कारखान्याचा प्रतिसाद; सुरु करणार ऑक्सिजन निर्मिती
- मोदी सरकारवर टीका करणारे नेते, अभिनेत्यांचे ट्विट्स ब्लॉक
- दुर्घटनांमध्ये अधिक रुग्णांचे मृत्यू व्हावेत अशी राजेश टोपेंची इच्छा आहे का ? भाजप नेत्याचा संतप्त सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
