🕒 1 min read
मुंबई- विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांचे आज निकाल लागणार आहेत. एक डिसेंबरला पाच मतदारसंघांमध्ये या निवडणुका पार पडल्या होत्या. यामध्ये महाविकास आघाडी आणि भाजपा आमने-सामने उभे होते. पाचही मतदारसंघ महत्त्वाचे असले, तरी पुणे आणि नागपूरच्या निकालांकडे जास्त लक्ष असणार आहे. यासोबतच, आज विधानपरिषदेच्या धुळे-नंदुरबार पोटनिवडणुकींचेही निकाल समोर येणार आहेत.
दरम्यान, सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या धुळे नंदुरबार स्थानिक संस्था विधानपरिषद निवडणुकीत अमरीश पटेल यांचा दणदणीत विजय झाला आहे. विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे 115 मत फुटली.भाजपची 199 तर महाविकास आघाडीचे 213 मतदान होते मात्र, महाविकास आघाडीच्या 115 मतदारांचे क्रॉस व्होटिंग झाल्याने अभिजित पाटील यांचा पराभव झाला.
भाजपचे अमरीश पटेल मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाल्यानं महाविकास आघाडीच्या एकीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. तर दुसरीकडे आजचा दिवस भारतीय जनता पक्षासाठी विजयाचा दिवस राहणार आहे. हे आम्हाला पहिल्यापासून माहीत होतं.याची सुरुवात अमरीश पटेल यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आजच्या सर्वच जागा भारतीय जनता पक्ष जिंकेल असा आमदार नितेश राणेंनी व्यक्त केला.
दरम्यान, पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार मतदार संघांच्या निवडणुकीच्या मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. उमेदवारांची संख्या जास्त असल्याने जम्बो मतपत्रिका झाल्या आहेत. त्यामुळे मतपत्रिका एकत्र करणे, वैध आणि अवैध मतपत्रिका वेगवेगळ्या करणे, कोटा निश्चित करणे या प्रक्रिया पूर्ण होण्यास विलंब लागणार असून, प्रत्यक्ष मतमोजणी होण्यास सायंकाळ होणार असल्याचा अंदाज आहे.
महत्वाच्या बातम्या
-
सहा महिन्यांचे राशन घेऊन आलोय, आता मागे हटणार नाही; द ग्रेट खली आक्रमक!
-
व्याजदर निर्णयासाठी आरबीआयची बैठक सुरू; विकास दर अंदाजात सुधारणा?
-
पुणे : भाजपचे संग्राम देशमुख आणि राष्ट्रवादीचे अरुण लाड यांच्यातच प्रमुख लढत
-
शेतकरी आंदोलनाला १०० हून जास्त संघटनांनी दिला जाहीर पाठिंबा
-
धनंजय मुंडे म्हणाले विजय आमचाचं; प्रीतम मुंडे म्हणतात गुलाल आमचाचं!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
