पारनेर : राज्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. बहुतेक मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर येत आहेत. वाढत्या भ्रष्टाचारामुळे सामान्य जनतेला जीवन जगणे कठीण होऊन बसले आहे. मात्र याबाबत केंद्र व राज्य सरकार भ्रष्टाचार रोखण्यासाठी कोणतीही पावले उचलत नाहीये. त्यामुळे राज्यात सक्षम लोकायुक्तांच्या नियुक्तीसाठी वयाच्या ८५ व्या वर्षी पुन्हा एकदा आंदोलन करावे लागेल, असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे, की केंद्रीय लोकपाल, लोकायुक्त कायद्यातील तरतुदीनुसार,केंद्रात लोकपाल कायदा लागू झाल्यापासून एक वर्षांच्या आत देशातील सर्व राज्यांनी लोकपालच्या धर्तीवर लोकायुक्त कायदा करणे बंधनकारक आहे. मात्र राज्यातून सुरुवात झालेल्या आंदोलनाला वर्षे लोटली. तरीही राज्यात अजूनही लोकायुक्त कायदा झालेला नाही. त्यासाठी आपले सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. युती सरकारच्या काळात ३० जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०१९ असे ७ दिवसांचे उपोषण केले. त्या वेळी शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे तसेच विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला होता.तत्कालीन सरकारने निर्णय घेऊ न मसुदा समिती नेमली. या समितीच्या आजपर्यंत ६ बैठकाघेतल्या. मात्र कोरोनानंतर एकही बैठक झाली नाही. असे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.
त्यामुळे राज्यात लोकायुक्त कायदा होणे गरजेचे आहे. यासाठी गरज पडल्यास पुन्हा आंदोलन करण्यास तयार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘साज़िशें लाखो बनती है मेरी हस्ती मिटाने की…’; भुजबळांचे खास शायरीतून विरोधकांना प्रत्युत्तर
- मोठी बातमी : पुणे पोलिसांकडून नीलम राणे, आमदार नितेश राणेंविरोधात लूक आऊट नोटीस
- मुंबईत कलम १४४ म्हणजेच जमावबंदी लागू; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘अशी’ आहे नियमावली
- पुण्यात गणेशोत्सव काळात खरंच जमावबंदी ? दिवसभरातील चर्चांनंतर पोलिसांकडून स्पष्टीकरण
- औरंगाबादेतून ७५ बसेस गणपती उत्सवासाठी कोकणात रवाना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

