औरंंगाबाद : सेवानिवृत्त ग्रंथालय परिचराकडून सेवापट पडताळीसाठी दहा हजारांची लाच मागुन साडेनऊ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या विभागीय सह संचालक (उच्च शिक्षण) विभागात कार्यरत वरिष्ठ लिपीक ज्ञानोबा बळीराम निर्मळ (वय ५४, रा. मातोश्री नगर, गारखेडा परिसर) याची हर्सुल कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.बी. पारगांवकर यांनी शुक्रवारी (दि.६) दिले.
६२ वर्षीय तक्रारदार हे जालना जिल्ह्यातील अंबड येथे एका महाविद्यालयतून एप्रिल २०१९ रोजी ग्रंथालय परिचय पदावरुन सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्ती नंतर त्यांनी सेवा पडताळणी करुन घेण्यासाठी ८ मार्च २०२१ रोजी विभागीय सह संचालक (उच्च शिक्षण) विभागात प्रस्ताव सादर केला.
तो प्रस्ताव मंजूर करुन सेवापट पडताळणी करुन देण्यासाठी वरिष्ठ लिपीक ज्ञानोबा निर्मळ याने तक्रारदाराकडून दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी जालना लाच लूचपत प्रतिबंक विभाकडे तक्रार दिली. तक्रारीनुसार एसीबीने सापळा रचून एक जून रोजी विभागीय सहा संचालक(उच्च शिक्षण) कार्यालयाच्या आवारात सापळा रचून साडेनऊ हजारांची लाच स्वीकारतांना अटक केली. प्रकरणात वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त संभाजीराजेंचं नवं ट्वीट; म्हणाले, यंदाचा सोहळा…
- अभिनेत्री यामी गौतमने चाहत्यांना दिला सुखद धक्का, दिग्दर्शकासोबत बांधली लग्नगाठ
- डब्लुटीसी फायनल संदर्भात ‘ब्रेट ली’ची सावध प्रतिक्रीया, म्हणाला…
- पंजाबमध्ये अमरिंदर सिंह विरुद्ध सिद्धू वाद चिघळला; निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये घमासान
- ‘राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या भोसले समितीत मराठाद्वेषी सदस्य’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
