Share

दोन अधिकारी मिळून सांभाळणार औरंगाबाद मनपाचा आरोग्य विभाग, यंत्रणेला मोठा दिलासा!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : महापालिकेच्या आरोग्य विभागाला स्वतंत्र अधिकारी देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे या मागणीची दखल घेत राज्य सरकारने डॉ. पारस मंडलेचा यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून प्रभारी म्हणून काम पाहणाऱ्या डॉ. नीता पाडळकर यांच्याकडील कामाची आता विभाग होणार आहे. गुरुवारी या दोघांना आरोग्य विभागाचे काम विभागून देण्यात आले आहेत. याबाबत गुरुवारी प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी आदेश काढून दोन अधिकार्‍यांना कामाची विभागणी करून दिली आहे.

डॉ. पारस मंडलेचा यांच्याकडे आरोग्य वैद्यकीय अधिकारी प्रशासन, वैद्यकीय परतावा प्रकरणे, वैद्यकीय रजा मंजुरी, जीवशास्त्रज्ञ व मलेरिया विभाग, किटकजन्य आजार, बायोमेडिकल वेस्ट, जन्म मृत्यू प्रकरणी, आरोग्य सर्व मनपा रुग्णालय, आस्थापना विषयक सर्व कामे असणार आहेत. तर डॉ नीता पाडळकर यांच्याकडे आरोग्य वैद्यकीय अधिकारी-२, कोविड-१९, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, सुधारित क्षयरोग नियंत्रण कामे, नर्सिंग होम, गर्भलिंग निदान कायदा अंमलबजावणी, गर्भपात कायदा अंमलबजावणी, औषधी भांडार , सर्व राष्ट्रीय कार्यक्रम हे कामे त्यांना करावी लागणार आहेत.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेला शासनाकडून प्रतिनियुक्तीवर अधिकारी मिळावा अशी मागणी महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी शासनाकडे केली होती. त्यानुसार आता शासनाने बीड जिल्हा रुग्णालयातील बधिरीकरण तज्ञ डॉ. पारस मंडलेचा यांची प्रतिनियुक्तीवर महापालिकेत बदली केली आहे. बदलीचे आदेश निघाल्यानंतर आठ दिवसांनी मंडलेचा गत आठवड्यात बुधवारी महापालिकेत आले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!