औरंगाबाद : शहरातील अनेक भागांमध्ये कचरा कोंडीची समस्या निर्माण झालेली पाहायला मिळते. मुख्य चौकाचौकात बेजबाबदार नागरिकांकडून कचरा टाकला जात असल्याने मोठ्या प्रमाणावर कचरा साचलेला पाहायला मिळतो. मात्र यामुळे शहराच्या स्वच्छता रँकिंकवर परिणाम होत आहे. अशा बेजबाबदार नागरिकांविरोधात आता मनपाचे स्वच्छता कर्मचारी एकवटले आहेत. नवजीवन कॉलनीत डीपीसमोर कचरा टाकलेल्या जागेवर कर्मचाऱ्यांनी साफसफाई करून स्वच्छता केली. या जागेवर रांगोळी काढली. येत्या काळात शहरात अनेक ठिकाणी हा उपक्रम राबवणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
नवजीवन कॉलनी झोन क्रमांक ४ मध्ये नेहमीच मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात असे. त्यामुळे याठिकाणी दुर्गंधीची समस्या निर्माण झाली होती. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. येथील व्यावसायिक, दुकानदारांकडून उघड्यावर कचरा फेकला जात होता. रेड्डी कंपनीचे या भागाकडे दुर्लक्ष झालेले आहे. शहरात कोणतीही व्यक्ती कचरा टाकतांना आढळल्यास फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. मात्र याची अंमलबजावणी होतांना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर मनपाचे झोन ४ चे वॉर्ड अधिकारी विक्रम दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरिक्षक डि. जे. पाटील यांच्या संकल्पनेतून स्वच्छता जवान सुरेश बोर्डे, राजेंद्र खरात, विलास साठे, विद्या रगडे, मनीषा गायकवाड या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सदर परिसर स्वच्छ केला.
याठिकाणी सडारांगोळी करत परिसराला सुशोभित केले. तसेच कुंडीमध्ये झाड लावत ते मध्यभागी ठेवण्यात आले. येथील नागरिकांकडून या अभिनव उपक्रमासाठी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. येत्या काळात अशा विविध दुर्गंधीग्रस्त परिसरात असे उपक्रम राबवणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- उस्मानाबादचे व्यापारी जीएसटी विरोधात आक्रमक
- बाळासाहेब होते म्हणून आम्ही आहोत; बाळासाहेबांच्या चरणी नतमस्तक होताना नांदगावकर गहिवरले
- बेळगावला केंद्रशासित राज्य करा ! शिवसेना खा. विनायक राऊतांचे मोदींकडे साकडे
- ‘हे महा आघाड़ी सरकार, की महा गुंडा़ सरकार; व्हायरल व्हिडीओवरून राम कदमांचा हल्लाबोल
- निळवंडेच्या कामासाठी मामांच्या मागे लागा अन्यथा तुमचा मामा होईल; अजितदादांचा प्राजक्त तनपुरेंना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

