Share

खासदारांनी आकडे मोड नीट करावी – राजू तनवाणी

Published On: 

औरंगाबाद : जो घोटाळा नाहीच, त्याला कोणाच्या तरी ऐकण्यावरून, पत्रकारांसमोर मोठा आकडा सांगत १०० कोटींचा घोटाळा झाला असे सांगणे चूक आहे. तसेच कोटींचा आकडा सांगत असताना तो कागदावर मूळ कितीचा आकडा आहे. हे खासदारांनी तपासावे, उगाच कोणतीही आकडे मोड करू नये, ज्यामुळे लोकांची दिशाभूल होईल असा प्रत्यारोप माजी नगरसेवक राजू तनवाणी यांनी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर केला आहे.

खासदारांनी केलेल्या आरोपांचे खंडन करत तनवाणी म्हणाले की, खासदारांनी आकडा नीट मोजावा, त्यांना या प्रकरणात एक शून्य वाढवावं वाटलं तो त्यांचा प्रश्न. कोणाच्या सांगण्यावरून आरोप करत असताना, त्यांनी प्रकरणाची शहानिशा करावी. ज्या वक्फ बोर्डाच्या जागे संदर्भात ते बोलत आहे. त्या जागेच्या नाहरकत प्रमाणपत्रासाठी आम्ही आधीच पत्र व्यवहार केला आहे. अजून त्यांचे उत्तर आलेले नाही.

१०० कोटी मोठी रक्कम आहे, आकडे मोड करत असताना संख्या तपासावी त्यामुळे लोकांची दिशा भूल होणार नाही. ज्या जागेचा ते खरेदी विक्रीचा दावा करत आहे, त्या जागेचा भाडेकरार नोंदवला आहे. तसे दस्तऐवज माझ्या कडे आहेत. त्याजागेवरच्या निकालावर उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ती ऑगस्ट २०१८ मध्येच दिली आहे, त्याबरोबर काम करण्याचे ही आदेश असल्याचे राजू तनवाणी यांनी महाराष्ट्र देशाशी बोलताना सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!