Share

उस्मानाबादचे व्यापारी जीएसटी विरोधात आक्रमक

Published On: 

उस्मानाबाद : वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी विरोधात उस्मानाबादमधील व्यापारी आक्रमक झाले आहेत. जीएसटी पोर्टलमध्ये गतिमानता आणून सुसूत्रता आणावी, रिटर्नची संख्या कमी करावी, तसेच दंड रद्द करण्यात यावा आदी मागण्या या व्यापाऱ्यांनी केल्या आहेत. त्यासाठी उस्मानाबादमधील जीएसटी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत व्यापाऱ्यांनी आंदोलन केले. या मागण्यांसदर्भातील निवेदन जीएसटी अधिकारी भगवंत चेचे यांना देण्यात आलं.

जीएसटी भरतांना व्यापाऱ्यांना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळं व्यापारात सुलभता आणण्याचा मुळ उद्देश पूर्ण होत नसल्याचं या वेळी व्यापाऱ्यांनी सांगितलं. व्यापाऱ्यांनाच नाही तर सीए देखील या पोर्टलमुळे त्रस्त आहेत. त्यातच जीएसटी भरण्यास उशीर झाला तर त्यावरही दंड भरावा लागतो. त्यामुळं हा दंड रद्द करावा आणि जीएसटी पोर्टलमध्ये गतिमानता आणावी अशी मागणी या वेळी व्यापाऱ्यांनी केली आहे.

या संदर्भातले निवेदन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनाही देण्यात आलय. त्यासाठी कर सल्लागार आणि व्यापाऱ्यांनी शहरातील मुख्य रस्त्याने रॅली काढली. यावेळी सीए. बी.बी. ताम्हाणे, राधेश्याम तापडीया, दीपक भातभोगे, गोरोबा घोडके आदींची प्रमुख उपस्थिती होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!