औरंगाबाद : पदमपुरा येथील महानगरपालिकेच्या रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मोठ्या प्रमाणावर निघत आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन कोविड चाचणी करून घेणाऱ्या व्यापारी व दुकानदारांनी पदमपुरा येथील महानगरपालिकेच्या रुग्णालयात गर्दी करू नये, असे आवाहन महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी केले आहे. व्यापाऱ्यांच्या कोरोना चाचणीसाठी मनपाने सहा पथके तैनात केली आहेत.
सध्या शहरात कोरोना संसर्ग रुग्णाची संख्या वाढत आहे. या वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कोरोना चाचणी करण्यासाठी पदमपुरा येथील महानगरपालिकेच्या रुग्णालयात नागरिकांबरोबर व्यापारी व दुकानदाराची गर्दी होत आहे. या ठिकाणी होम आयसोलेशन वॉर्ड असल्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण याठिकाणी तपासणीसाठी येत असतात.
त्यांचा संसर्ग होऊन रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यापारी व दुकानदारांनी पदमपुरा येथील महानगरपालिका रुग्णालयात गर्दी करू नये. यासाठीच कोविड चाचणीसाठी औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने सहा टीम उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
टिळक पथ पैठणगेट, पाटीदार भवन जालना रोड, अग्रसेन भवन, कॅनॉट प्लेस, जिजाई हॉस्पिटल, गजानन मंदिर गारखेडा परिसर, अपना बाजार जालना रोड, बालाजी धर्मशाळा, शहागंज याठिकाणी व्यापाऱ्यांसाठी कोरोना चाचणी करून घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कारवाईसाठी आलेल्या पालिकेच्या पथकालाच ठोठावला दंड!
- लॉकडाऊनच्या पाहणीसाठी तिनही उच्चपदस्थ अधिकारी रस्त्यावर!
- आंदोलन, वाद, आरोप-प्रत्यारोपानंतर पंकजा मुंडेंचा ‘वैद्यनाथ’ पुन्हा सुरू
- कानड्यांची मुजोरी सुरूच ! मराठी बोर्डांना फासलं काळं
- कर्नाटकातून आलेला १३ लाखांचा गुटखा जप्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

