🕒 1 min read
लातूर : राज्यात गुटखा बंदी असताना सुद्धा परराज्यातून गुटख्याचे व्यापार मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याचे दिसून येत आहे. राज्यात गुटखा बंदीसाठी प्रशासनाने मोहीम हातात घेतल्यानंतर सुद्धा अजूनही गुटखा भेटत असल्याचे दिसून येत आहे. ह्या गुटख्याच्या व्यापाराला चाप बसावा म्हणून सध्या प्रशासनाने कंबर कसली आहे. याचाच भाग म्हणून शिरूर अनंतपाळ येथे पोलिसांनी सापळा रचून १३ लाखाचा गुटखा जप्त केला आहे.
ही घटना गुरुवारी रात्री अकरा वाजता घडली. पोलिसांना मिळालेल्या माहिती नुसार नुरसाब उंटवाले हा व्यक्ती कर्नाटकातून अवैधरित्या गुटखा राज्यात आणून विकणार आहे. या मिळालेलया माहितीवरून पोलिसांनी त्याला रात्री अकरा वाजता सापळा रचत अटक केली. सदर व्यक्ती हा बुलेरो पिकअप व्हॅन घेऊन येत असताना पोलिसानी त्याला अडवत तपासणी केली असता प्रतिबंधित असलेला गुटखा त्याचाकडे आढळला.
त्या व्हॅनमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित गुटखा होता. हा गुटखा घेऊन राज्यातील काही ठिकाणी तो पोहोचत करण्याचा त्याचा प्रयत्न होता. या कारवाईमुळे येणाऱ्या काळात या गोरख धंद्याला मोठा फटका बसणार आहे. महाराष्ट्रात परराज्यातून येणारा गुटखा सरकारने बंद करण्याच्या दिशेने पाऊल उचलण्याची गरज आहे.
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्र-कर्नाटक वाद चिघळला; कोल्हापुरात महाराष्ट्र शासनाच्या बसवर दगडफेक
- ‘लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्री मंगळवारी संबोधित करणार’
- २० वर्षांपासून प्रलंबित रस्त्याचे काम कधी मार्गी लागणार?
- हिंगोलीकरांकडे पाणीपट्टीचे तब्बल साडे तीन कोटी थकित
- NEET परीक्षेची तारीख जाहीर; ‘या’ तारखेला होणार परीक्षा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
