औरंगाबाद : कोरोना संसर्ग पुन्हा एकदा शहरात जोमाने पसरू लागला आहे. संपूर्ण शहरालाच कोरोनाने विळखा घातल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ११ मार्चपासून अंशतः लॉकडाऊन तर शनिवार रविवार कडक लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. आज (दि.१३) कडक लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी, मनपा आणि पोलीस आयुक्त यांनी अण्णाभाऊ साठे चौक, टिव्ही सेंटर चौकात पाहणी केली. त्यानंतर तिनही अधिकारी संपूर्ण शहरात विभागले गेले.
आज कडक लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी अण्णाभाऊ साठे चौक, टिव्ही सेंटर चौकात पाहणी केली. यावेळी विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांनी बाहेर फिरण्याचे कारण विचारत विचारपूस केली.
त्यानंतर तिनही अधिकारी शहरातील वेगवेगळ्या भागात विभागले गेले. मनपा आयुक्तांनी आंबेडकर चौक, सिडको बसस्थानक भागात तैनात असलेल्या पोलिसांशी संवाद साधला. लॉकडाऊनचे पालन कशाप्रकारे होत आहे. याची पाहणी केली. यावेळी जनसंपर्क अधिकारी संजीव सोनार उपस्थित होते.
शहरात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यावेळी घराघरात रुग्ण निघत आहेत. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच प्रशासनाने कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर ११ मार्च ते ४ एप्रिल पर्यंत अंशतः लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे.
तर शनिवार आणि रविवार कडक लॉकडाऊन असणार आहे. मात्र नागरिकांकडून अजूनही कोरोना नियमांचे उल्लंघन केले जात असल्याने गुरुवारी देखील तिनही अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरत कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चांगलाच चोप दिला होता.
महत्त्वाच्या बातम्या
- कर्नाटकातून आलेला १३ लाखांचा गुटखा जप्त
- भाजपच्या विरोधात प्रचार करण्यासाठी राकेश टिकैत प.बंगालमध्ये पोहचले
- आरोपीसोबत मद्यपार्टी भोवली; सहायक उपनिरीक्षकासह दोघे निलंबित
- कोरोना तपासणी केंद्रात ‘रेटारेटी’ अन ‘दाटीवाटी’
- परभणीमध्ये संचारबंदीत रस्त्यावर शुकशुकाट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
