Share

कानड्यांची मुजोरी सुरूच ! मराठी बोर्डांना फासलं काळं

Published On: 

🕒 1 min read

बेळगाव : पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटक या दोन राज्यांमध्ये वाद चिघळला आहे. याचं कारण म्हणजे कानड्यांनी शुक्रवारी बेळगावात शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या वाहनावर हल्ला केला होता. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा गेल्या कित्येक दशकांपासून सुरु आहे. मात्र, आता कानड्यांनी मराठी भाषेचा अनादर केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

सीमाभागातील मराठी बांधवांवर कानडी संघटना या वारंवार दबाव निर्माण करत असतात. त्यांचा मानसिक छळ तसेच संपत्तीचे नुकसान केल्याच्या देखील अनेक घटना समोर आल्या आहेत. कर्नाटक रक्षण वेदिके या संघटनेच्या लोकांनी बेळगावात मराठी भाषेत उल्लेख असलेल्या बोर्डांना काळं फासलं आहे. काही फलकांची नासधूस तर काही फलकांवर मराठी भाषेत असलेल्या उल्लेखावर काळा रंग फासण्यात आला आहे. यामुळे आता कोल्हापूरसह सीमाभागात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये पुन्हा एकदा तणाव वाढला असून केंद्र सरकार गेली अनेक दशके सुरु असलेल्या सीमा वादावर काही तोडगा काढणार का ? यावर पुन्हा एकदा चर्चा सुरु झाल्या आहेत. दरम्यान, ‘देश हा स्वातंत्र्य असून अशाप्रकारे एखाद्या राज्यात मराठी भाषिकांना लक्ष्य केलं जाणं हे संतापजनक असून याबाबत केंद्र सरकारने कर्नाटक सरकारला फटकारणे गरजेचं आहे, अन्यथा शिवसेना चोख उत्तर देईल,’ असा इशारा शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!