Share

गावाजवळ मुबलक पाणीसाठा; मात्र, प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे गावकऱ्यांची पाण्यासाठी पायपीट

Published On: 

जालना : गावाजवळ तीन विहिरीत मुबलक पाणीसाठा असतानाही, जाफ्राबाद तालुक्यातील डोणगाव येथीन नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. केवळ गावातील पाणीपुरवठा सुरळीत नसल्याने गावकऱ्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका सर्वसामान्य गावकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

जाफराबाद तालुक्यातील डोणगाव ग्रामपंचायतीला चार सार्वजनिक विहिरीअसूनही नळ योजना बंद आहे. त्यामुळे येथील नागरिकांना जानेवारीपासून पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीतून पाणी आणताना गावकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. डोणगाव येथे जवळपास चार हजार ग्रामस्थांची वस्ती आहे. येथे दरवर्षी पाण्याचा तुटवडा भासतो. त्यामुळे याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन गावातील पाणीपुरवठा सुरळीत कारावा, अशी मागमी करण्यात येत आहे.

ग्रामीण भागातील पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर व्हावी यासाठी प्रशासनाच्या वतीने कोट्यवधी रुपयांच्या पाणीपुरवठा योजना राबवण्यात येतात. मात्र, या योजना राबवूनही तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे विदारक चित्र समोर येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!