Share

‘आम्ही सर्व एकत्र रडत होतो’ ; निवडीनंतर सुर्यकुमार यादवची भावुक प्रतिक्रीया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबईकर सूर्यकुमार यादवला इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत संधी दिलेली आहे. बीसीसीआयची निवड समिती टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी सूर्यकुमार यादवला संधी देली गेली आहे. बीसीसीआयला आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी तगडा संघ उभा करायचा आहे. त्यामुळे देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकणारे तसेच आयपीएलमध्ये चमकलेल्या खेळाडूंना संधी दिली जात असल्याची चर्चा आहे.

त्यामुळेच सूर्यकुमार यादव याला देखीलया मालिकेत संधी दिलेली आहे. भारतीय संघ कसोटी मालिकेनंतर इंग्लंडविरुद्ध ५ टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. यामध्ये सूर्यकुमार यादवला संधी मिळालेली.

आयपीएल गाजवल्यानंतरही सुर्यकुमार यादवची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संघात निवड झाली नव्हती. त्यामुळे तो खूप नाराज झाला होता. मात्र आता बीसीसीआयने इंग्लंड विरुद्धच्या टी-20 संघात त्याची निवड केली आहे. त्याच्या या निवडीवर सुर्यकुमार यादवने भावुक प्रतिक्रीया दिली आहे. ‘संघात माझे नाव बघून मला अश्रू अनावर झाले’, अशी प्रतिक्रीया सुर्यकुमारने बीसीसीआयशी बोलताना दिली आहे.

‘संघ निवडीच्या दिवशी मी एकटाच खोलीत बसून चित्रपट पाहण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र लक्ष सर्व निवड समितीच्या बैठकीकडे होते. तेवढ्यात मोबाईलवर एक नोटिफिकेशन आले व त्यात माझी संघात निवड झाल्याचे लिहलेले होते. ते वाचून मी माझे अश्रू रोखू शकलो नाही. मी माझ्या आई वडिलांना, बायकोला व बहिणीला व्हिडीओ कॉल केला. आम्ही सर्व एकत्र रडत होतो’ असे बीसीसीआयला दिलेल्या मुलाखतीत सुर्यकुमारने सांगितले.

‘देशासाठी खेळणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. माझ्यासोबत माझे कुटुंबीय देखील ते स्वप्न बघत होते. ते माझ्या प्रत्येक सुखदुखात माझ्यासोबत उभे होते. त्यामुळे या बातमीनंतर त्यांना खूश बघून माझ्या डोळ्यातही आनंदाश्रू आले’, असे सुर्यकुमार याने सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!