🕒 1 min read
औरंगाबाद : शहरात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्ण संख्यावाढीचा आलेख दिवसेंदिवस वर वर जात आहे. त्याच घाटीच्या अधिष्ठाता डॉ कानन येळीकर यांना दि.११ रोजी कोरोना सदृश्य लक्षणे जाणवत होती. त्यांनी तत्काळ टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. शनिवारी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
मागील वर्षीपासून कोरोनाने शहरात चांगला धुमाकूळ घातला. घाटी मध्ये शहर तसेच जिल्ह्यातील गंभीर रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. त्याचे संपूर्ण नियोजन डॉ कानन येळीकर यांनी योग्य रीत्या हाताळले परंतु, दि. ११ गुरुवारी त्यांना गुरुवारी लक्षणे वाटू लागल्यामुळे त्यांनी चाचणी करण्याचे ठरविले, शनिवारी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी ३० जानेवारी रोजी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर दहा दिवसांपूर्वीच त्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला.
घाटी मध्ये गंभीर रुग्णांवर उपचार होतो, बहुतांश रुग्णांना ऑक्सिजन बेडची गरज लागते. सध्या त्यांना ऑक्सिजन बेडची गरज वाटत नसल्यामुळे त्या खासगी रुग्णालयात दाखल झाल्या, तसेच माझ्यामुळे घाटीतील एक ऑक्सिजन बेड अडायला नको, त्यामुळे एका रुग्णावर उपचार होतील असे हि त्या म्हणाल्या. तसेच संपर्कातील व्यक्तींनी चाचणी करून घेण्याचेही आवाहन त्यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आलिया भट्टची रणबीर कपुरच्या आठवणीत भावनिक पोस्ट
- ‘एमपीएससी परिक्षा २१ मार्च रोजी, सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा’
- नागरी घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्याकडून पाहणी
- शाळेच्या अनुदानासाठी १४० कोटीच्या निधीस मंजुरी : वर्षा गायकवाड
- महिलांचा आर्थिकस्तर उंचाविण्याचा जीवनज्योती अभियानातून प्रयत्न-मंगेश गोंदावले


